3 महिन्यात 4 कॅप्टन बदलले, तरीही टीम इंडियाचा विजयरथ सुस्साट
राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रक्षिकपदाची धुरा हाती घेतली आहे. तीन महिन्यांपासून तो संघांसोबत आहे. या तीन महिन्यात 4 मालिकांमध्ये भारतीय संघाने चार कर्णधार बदलले. पण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली आणि कॉमन आहे ती म्हणजे टीम इंडियाचा विजय.
1 / 5
राहुल द्रविडने टीम इंडियाच्या प्रक्षिकपदाची धुरा हाती घेतली आहे. तीन महिन्यांपासून तो संघांसोबत आहे. या तीन महिन्यात 4 मालिकांमध्ये भारतीय संघाने चार कर्णधार बदलले. पण, या सगळ्यात एक गोष्ट चांगली आणि कॉमन आहे ती म्हणजे टीम इंडियाचा विजय.
2 / 5
राहुल द्रविडने न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या घरच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. या मालिकेत रोहित शर्मा कर्णधार होता. भारताने ही मालिका सहज जिंकली.
3 / 5
न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर कसोटी मालिका सुरू झाली तेव्हा 2 सामन्यांत 2 कर्णधार दिसले. कानपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत विराट कोहली उपलब्ध नसल्याने अजिंक्य रहाणेने कर्णधारपद भूषवले होते. आणि जेव्हा विराट कोहली मुंबईतील दुसऱ्या कसोटीसाठी परतला तेव्हा त्याने कर्णधारपदाची सूत्रे हाती घेतली. न्यूझीलंडविरुद्धची ही कसोटी मालिकाही भारताने जिंकली.
4 / 5
भारताचा कसोटी संघ सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडचा हा पहिलाच परदेश दौरा आहे. सेंच्युरियन म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा अभेद्य किल्ला जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडीही घेतली आहे. विराट कोहली या मालिकेतही भारतीय कर्णधार आहे आणि तो इतिहास रचण्याच्या जवळ आहे. कारण त्याच्याकडे दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार बनण्याची सुवर्णसंधी आहे. विशेष म्हणजे हे राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये होईल. स्वतः द्रविड दक्षिण आफ्रिकेत पहिली कसोटी जिंकणारा भारतीय कर्णधार आहे.
5 / 5
दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठीही टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. पण विराट, रोहित किंवा रहाणे कर्णधार नसून केएल राहुल संघाचं नेतृत्व करेल. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली खेळली जाणारी ही चौथी मालिका असेल. आणि यामध्ये चौथा कर्णधार टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे.