मुंबई: चांगलं प्रदर्शन करुनही अनेकदा कुलदीप यादवला टीम इंडियातून वगळण्यात येतं. कुलदीप यादवचा आधीच्या मॅचमध्ये परफॉर्मन्स चांगला असतो. पण त्याला बाहेर बसवलं जातं. कुलदीप यादव मागच्या साडेपाच वर्षात भारतासाठी फक्त 8 कसोटी सामने खेळलाय. टीम इंडियासाठी त्याने सातत्यपूर्ण प्रदर्शन केलय. मात्र तरीही कुलदीपच टीममध्ये आत-बाहेर सुरु असतं. कुलदीप यादववर प्रत्येकवेळी अन्याय का होतो? यामागे एक कारण आहे.
मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार
कुठल्याही क्रिकेटरसाठी टीम इंडियाच्या बाहेर जाणं दु:खद असतं. कारण एकदा बाहेर गेल्यानंतर पुन्हा टीममध्ये परतणं सोपं नाहीय. एकापेक्षाएक टॅलेंटेड खेळाडू आहेत. त्यामुळे भारतीय टीममध्ये सिलेक्शनसाठी एक मोठी स्पर्धा असते. बांग्लादेश विरुद्ध चटोग्राममध्ये पहिला कसोटी सामना झाला. या मॅचमध्ये कुलदीपने जबरदस्त प्रदर्शन केलं. त्याने एकूण 8 विकेट काढल्या व 40 धावा बनवल्या. कुलदीप यादवला या बेस्ट प्रदर्शनसाठी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कारही मिळालाय.
का बाहेर बसवतात? समोर आलं मोठं कारण
कुलदीप यादवने टीम इंडियाकडून खेळताना 8 सामन्यात 34 विकेट घेतल्यात. यात 3 वेळा त्याने 5 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. इतकी चांगली कामगिरी करुनही, त्याला ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजामुळे टेस्ट टीमच्या बाहेर रहावं लागलं. टीम इंडिया जेव्हा मायदेशात कसोटी सामना खेळते, तेव्हा तीन स्पिनर्सचा टीममध्ये समावेश होणार असेल, तरच कुलदीपला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळते.
कुलदीपला कोणाकडून स्पर्धा?
कुलदीप यादव टॅलेंटमध्ये कुठेही कमी नाहीय. पण टीम मॅनेजमेंट फलंदाजीचा विचार करुनही त्याला अनेकदा संधी नाकारते. सध्या रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे टीम इंडियाच्या बाहेर आहे. त्याच्याजागी अक्षर पटेलला वारंवार संधी मिळतेय. कुलदीपचा स्पर्धा एकप्रकारे अक्षर बरोबर आहे. फलंदाजीचा विचार केल्यास अक्षर पटेलच पारड जड आहे. त्यामुळे कुलदीप मिळालेल्या प्रत्येक संधीच सोन करावं लागेल. आत-बाहेर होण्यासामुळे अनेकदा खेळाडूच मानसिक खच्चीकरण होतं. आत्मविश्वास डळमळतो पण कुलदीप यादवने यावर मात करुन प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध केलय.