Team India : टीम इंडियाच्या ‘या’ प्लेयरला प्रेमात पुन्हा मिळाला धोका, दुसऱ्या गर्लफ्रेंडने सुद्धा केलं ब्रेकअप

| Updated on: Jul 09, 2023 | 4:01 PM

Team India : आयपीएलमध्येही दोघे एकत्र दिसले होते. पण आता त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या आहेत. दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्या येत आहेत.

Team India : टीम इंडियाच्या या प्लेयरला प्रेमात पुन्हा मिळाला धोका, दुसऱ्या गर्लफ्रेंडने सुद्धा केलं ब्रेकअप
Nidhi Tapadia
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : टीम इंडियाच्या एका खेळाडूला प्रेमात पुन्हा धोका मिळाला आहे. मागच्या काही महिन्यापासून दोघांच्या प्रेम प्रकरणाची चर्चा होती. वॅलेंटाइन्स डे त्यानंतर आयपीएलमध्येही दोघे एकत्र दिसले होते. पण आता त्यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याच्या बातम्या आहेत. दोघांमध्ये ब्रेक अप झाल्याच्या बातम्या येत आहेत. हा क्रिकेटर व्यक्तीगत आयुष्यात सुद्धा अडचणीच सापडला आहे.

सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात दोघांनी परस्परासोबतचे अनेक फोटो शेअर केले होते. त्यावरुनच दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच समजलं होतं. पण आता त्यांच्या प्रेमसंबंधात दुराव आला आहे.

ब्रेकअप झाल्याची चर्चा

टीम इंडियाच्या या प्लेयरच नाव आहे पृथ्वी शॉ. काही महिन्यापूर्वी एका मॉडेलसोबत रस्त्यावर झालेल्या हाणामारी प्रकरणामुळे सुद्धा हा क्रिकेटपटू वादात सापडला होता. सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. आता पृथ्वी शॉ च निधी तापडियासोबत ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे.


ती मुलगी महाराष्ट्राच्या नाशिकची

पृथ्वी शॉ आणि निधी तापडियाने इन्स्टाग्रामवर परस्परांना अनफॉलो केलय. त्यामुळे त्यांचं ब्रेकअप झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. निधी तापडिया एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. सोशल मीडियावर नेहमी ती चर्चेत असते. निधी तापडियाचे इन्स्टाग्रामवर 121 K फॉलोअर्स आहेत. ती महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्याची निवासी आहे.

आधी कुठल्या अभिनेत्रीला डेट करत होता?

पृथ्वी शॉ नव्या वर्षात पार्टी करण्यासाठी एका पबमध्ये गेला होता. त्या पार्टीत निधी तापडिया सोबत होती. दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आयपीएल 2023 मध्येही निधी तापडिया मैदानावर पृथ्वीला सपोर्ट करताना दिसली होती. पृथ्वी शॉ याआधी अभिनात्री प्राची सिंहला डेट करत होता. 2020 दरम्यान दोघांमध्ये अफेअर सुरु असल्याच्या बातम्या होत्या. सोशल मीडियावरुन दोघांमध्ये जवळकी वाढल्याच दिसत होतं. पण हे प्रेम प्रकरण सुद्धा फिस्कटलं.