Ravindra jadeja : 63 वर्षाच्या अभिनेत्रीच्या बळावर रवींद्र जाडेजा कमावणार कोट्यवधी रुपये, खेळला ‘मास्टर स्ट्रोक’

| Updated on: Mar 07, 2023 | 8:16 AM

Ravindra jadeja : रवींद्र जाडेजा सध्या बॉर्डर-गावस्कर सीरीजमध्ये व्यस्त आहे. चौथ्या कसोटीआधी त्याने फॅन्सना आनंदाची बातमी दिलीय. या सीरीजमध्ये त्याने आतापर्यंत कमालीच प्रदर्शन केलय. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये त्याने 7 विकेट घेताना 70 धावा केल्या.

Ravindra jadeja : 63 वर्षाच्या अभिनेत्रीच्या बळावर रवींद्र जाडेजा कमावणार कोट्यवधी रुपये, खेळला मास्टर स्ट्रोक
Ravindra jadeja
Image Credit source: instagram
Follow us on

मुंबई : रवींद्र जाडेजा सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये व्यस्त आहे. बॉर्डर-गावस्कर सीरीजमधला चौथा कसोटी सामना बाकी आहे. 9 मार्चपासून अहमदाबादमध्ये चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी जाडेजाच्या नव्या इनिंगबद्दल माहिती समोर आलीय. रवींद्र जाडेजाची 63 वर्षांच्या अभिनेत्रीच्या बळावर कोट्यवधी रुपये कमावण्याची योजना आहे. त्याने चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आहे. ‘पहचहत्तर का छोरा’ या चित्रपटाची निर्मिती रवींद जाडेजा करणार आहे. या चित्रपटात रणदीप हुड्डा आणि नीना गुप्ता यांची महत्त्वाची भूमिका असेल.

नीना गुप्ता यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताचे फोटो शेअर केलेत. यात जाडेजासोबत त्याची बायको रिवाबा सुद्धा दिसतेय. जाडेजा आणि त्याची बायको या चित्रपटाची प्रोड्युसर आहे. भारतीय ऑलराऊंडरने सुद्धा मुहूर्ताचे फोटो शेअर केलेत.


शूटिंग सुरु

चित्रपटाची शूटिंग राजस्थानमध्ये सुरु झाली आहे. या चित्रपटात नीना गुप्ता त्यांच्यापेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या रणदीप हुड्डासोबत रोमान्स करताना दिसणार आहेत. जाडेजा ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथा कसोटी सामना खेळण्यासाठी अहमदाबादमध्ये दाखल झालाय. या सीरीजमध्ये त्याने आतापर्यंत कमालीच प्रदर्शन केलय. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये त्याने 7 विकेट घेताना 70 धावा केल्या. दुसऱ्या टेस्टमध्ये 10 विकेट घेताना 26 धावा केल्या. इंदोर टेस्टमध्ये त्याने एकूण 4 विकेट घेतल्या. या सीरीजमध्ये त्याने आतापर्यंत 21 विकेट घेतल्यात.

चौथ्या टेस्टसाठी जाडेजा सज्ज

रवींद्र जाडेजा पुन्हा एकदा अहमदाबादमध्ये आपल्या फिरकीची कमाल दाखवण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियासाठी अहमदाबादमध्ये विजय आवश्यक आहे. फक्त मालिका विजयच नाही, तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील प्रवेश या विजयावर अवलंबून आहे.