Deepika Padukone Yuvraj Singh Break Up : बॉलिवूड आणि क्रिकेटच 70 च्या दशकापासून नात आहे. मन्सूर अली खान पतौडी आणि शर्मिला टागोर यांच्यापासून ही सुरुवात झाली. आजही बॉलिवूडच्या तारका आणि टीम इंडियाच्या स्टार क्रिकेटर्समध्ये अफेयरच्या बातम्या येत असतात. यात विराट कोहली-अनुष्का शर्मासारखी काही रिलेशनशिप विवाहाच्या बोहल्यापर्यंत पोहोचतात, तर दीपिका पादुकोण-युवराज सिंगसारखा काही नात्यांचा प्रवास मध्येच थांबतो. आज दीपिका पादुकोणचा बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये समावेश होतो. सुरुवातीपासूनच लोकांची नजर चित्रपटांपेक्षा तिच्या व्यक्तीगत आयुष्यावर राहिली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकवेळ दीपिका पादुकोणच स्टार क्रिकेटर युवराज सिंगसोबत अफेयर होतं. काही काळानंतर दोघांचे रस्ते वेगळे झाल्याच समोर आलं. आज आम्ही तुम्हाला दीपिका-युवराजच्या लव्ह स्टोरीबद्दल सांगणार आहोत.
युवराज दीपिकाबद्दल पजेसिव
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2008 साली दीपिका आणि युवराजच्या अफेयरबद्दल ऐकण्यात आलं होतं. टी 20 वर्ल्ड कपनंतर दोघांची ओळख झाली. लवकरच दोघे परस्परांचे चांगले मित्र बनले. दीपिका आणि युवराजची ही मैत्री लगेच प्रेमात बदलली. त्यानंतर अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट करण्यात आलं.
दीपिकाला युवराजची कुठली गोष्ट नाही आवडायची?
युवराज दीपिकाबद्दल बराच पजेसिव असल्याच म्हटलं जायचं. हीच गोष्ट दीपिकाला अजिबात आवडत नव्हती. युवराज सिंग दीपिकाच्या प्रोफेशनल लाइफमध्येही हस्तक्षेप करायचा. त्यामुळे दोघांचा लवकरच ब्रेकअप झाला.
युवराजने मुलाखतीत ब्रेकअपच कारण सांगितलं
दीपिकाने अभिनेता रणबीर कपूरसाठी मला सोडलं, असं युवराजने इशाऱ्यांमध्ये सांगितलं होतं. युवराजने एका मुलाखतीत या बद्दल खुलासा केला होता. दीपिका मला डेट करायची. पण तिने आयुष्यात दुसऱ्या व्यक्तीसोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला. हा तिचा पर्सनल निर्णय होता.
त्याच्या नावाचा दीपिकाने काढलेला टॅटू
रणबीर कपूरसोबत दीपिकाच खूपच सीरिरयस अफेयर होता. तिने रणबीरच्या नावाचा टॅटू सुद्धा आपल्या मानेवर गोंदवून घेतला होता. रणबीर बरोबर सुद्धा तिचा काही वर्षांनी ब्रेकअप झाला. त्यानंतर रणवीर सिंग तिच्या आयुष्यात आला. दोघांनी लग्न केलं असून त्यांचा संसार सुखाने सुरु आहे.