लंडन : टीम इंडियाचा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह सध्या इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट खेळतोय. त्याची बॉलिंग पाहून WTC फायनलमध्ये त्याला न खेळवून टीम इंडियाने चूक तर केली नाही ना? असा प्रश्न मनात येतोय. काऊंटी क्रिकेटमध्ये अर्शदीपने केंटसाठी डेब्यु केला. तो कमालीच प्रदर्शन करतोय. अर्शदीप लेफ्टी वेगवान गोलंदाजी करतो. ऑफ द विकेट असो, वा राऊंड द विकेट तो दोन्ही बाजूंनी विकेट टेकिंग बॉलिंग करतोय. त्याने आपल्या भेदक गोलंदाजीच्या बळावर शतक ठोकणाऱ्या फलंदाजाला तंबूची वाट दाखवली.
अर्शदीपचा प्रकोप केंट आणि सरेमध्ये सुरु असलेल्या सामन्यात दिसून आला. या मॅचमध्ये केंटने सरेसमोर विजयासाठी 501 धावांच अवघड लक्ष्य ठेवलं होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना सरेच्या टीमने 3 बाद 263 धावा केल्या आहेत. यात शतक ठोकणाऱ्या जेमी स्मिथचा महत्वाचा रोल होता.
धोका वाढण्याआधीच अर्शदीपकडून बंदोबस्त
जेमी स्मिथने फक्त 77 चेंडूत 114 धावा फटकावल्या होत्या. केंटसाठी तो धोकादायक ठरत होता. त्याचा धोका वाढण्याआधीच भारताच्या अर्शदीप सिंहने त्याचा बंदोबस्त केला व केंटच काम सोपं केलं. अर्शदीपने ऑफ द स्टम्प बॉलिंग करताना जेमी स्मिथला क्लीन बोल्ड केलं. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर वेगात आतमध्ये आला. स्मिथला अंदाज आला नाही. लांबलचक त्याचा ऑफ स्टम्प उडाला. स्टम्पचेच तीन टप्पे पडले.
Arshdeep Singh with a brilliant ball!
A great delivery to dismiss Jamie Smith#LVCountyChamp pic.twitter.com/RNgJdKeI1E
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) June 13, 2023
काऊंटी चॅम्पियनशिपमधला त्याचा पहिला विकेट
काऊंटी क्रिकेटमध्ये अर्शदीप घातक गोलंदाजी करतोय. त्याने पहिल्या इनिंगमध्ये अशाच प्रकारे इंग्लंडचा विकेटकीपर फलंदाज बेन फोक्सला सुद्धा धक्का दिला होता. त्यावेळी त्याने राऊंड द विकेट बॉलिंग करुन LBW आऊट केलं होतं. काऊंटी चॅम्पियनशिपमधला त्याचा हा पहिला विकेट होता.
Arshdeep Singh has his first #LVCountyChamp wicket!
The @KentCricket bowler gets one to nip back and dismisses Ben Foakes pic.twitter.com/RS4TTfAjut
— LV= Insurance County Championship (@CountyChamp) June 12, 2023
सरेकडे अजूनही विजयाची संधी
अजूनही सामना संपलेला नाही. सरेच्या टीमचे 7 विकेट बाकी आहेत. सरेची टीम विजयापासून 238 धावा दूर आहे. केंटच्या विजयाचा हिरो बनण्यासाठी अर्शदीपकडे मोठी संधी आहे.