Jasprit bumrah | बुमराहच्या मनाला ती गोष्ट खूप लागली, नंबर-1 बॉलर बनताच इन्स्टाग्राम स्टोरीमधून व्यक्त

| Updated on: Feb 08, 2024 | 9:20 AM

Jasprit bumrah | जसप्रीत बुमराहने टेस्ट क्रिकेटमध्ये नंबर 1 गोलंदाज बनून इतिहास रचलाय. इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरतोय. इन्स्टाग्रामवर त्याची एक पोस्ट चर्चेचा विषय बनलीय.

Jasprit bumrah | बुमराहच्या मनाला ती गोष्ट खूप लागली, नंबर-1 बॉलर बनताच इन्स्टाग्राम स्टोरीमधून व्यक्त
Jasprit Bumrah
Follow us on

Jasprit bumrah | टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आता टेस्ट फॉर्मेटमध्ये क्रिकेट विश्वातील नंबर 1 गोलंदाज बनलाय. बुधवारी आयसीसीने नवीन रँकिंग जारी केली. त्यात बुमराहने कमाल केलीय. ही रँकिंग जाहीर झाल्यानंतर बुमराहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट केलीय. या पोस्टमुळे बरेच जण कन्फ्यूज झालेत. बुमराह अखेर कोणावर निशाणा साधतोय. हा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे.

जसप्रीत बुमराहने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केलीय. यात त्याने म्हटलय की, एक-दोन लोकच तुमच समर्थन करतात. पण शुभेच्छा द्यायला हजारो लोक येतात. हा सोशल मीडियाचा एक मीम आहे, जो खूप व्हायरल होतोय.

एक टोमणा म्हणून पाहिल जातय

जसप्रीत बुमराहच्या या पोस्टकडे एक टोमणा म्हणून पाहिल जातय. कारण काही दिवसांपूर्वी जसप्रीत बुमराहला खूप ट्रोल करण्यात आलं होतं. त्यावेळी तो दुखापतग्रस्त होता. सोशल मीडियावर मीम्स बनले होते. “बुमराह फक्त आयपीएलच्यावेळी फिट होतो, इतरवेळी त्याची दुखापतीशी लढाई सुरु असते, म्हणून टीम इंडियाकडून खेळत नाही” असं त्या मीम्समध्ये म्हटलेलं.

ही गोष्ट आठवली असेल

दुखापतीमधून बाहेर पडल्यानंतर जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तिन्ही फॉर्मेटमध्ये नंबर 1 बनणारा भारताचा पहिला गोलंदाज बनलाय. जसप्रीत बुमराहच सध्या प्रचंड कौतुक होतय. भारताचा तो सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्यामुळे आज यश मिळाल्यानंतर बुमराहला ही गोष्ट आठवली असेल.

….तर हे चुकीचच ठरलं असतं

जसप्रीत बुमराह सध्या आग ओकणारी गोलंदाजी करतोय. पहिल्या दोन कसोटी सामन्यात त्याने 15 विकेट घेतलेत. तिसऱ्या कसोटीत त्याला आराम मिळणार नाही. तो खेळणार असल्याची माहिती आहे. मोठी कसोटी मालिका असल्याने बुमराहला आराम मिळेल अस बोलल जात होतं. इतक्या चांगल्या फॉर्ममध्ये असताना बुमराहला आराम दिला असता, तर हे चुकीचच ठरलं असतं.
.