मुंबई : टीम इंडियाला आशिया कप 2023 आधी मोठा दिलासा मिळालाय. टीम इंडियाचा हुकूमी एक्का परत येतोय. जसप्रीत बुमराह लवकरच पुनरागमन करणार आहे. पाठदुखी स्ट्रेस फ्रॅक्चरमुळे जसप्रीत बुमराह मागच्या वर्षभरापासून क्रिकेटच्या मैदानापासून लांब आहे. या दरम्यान तो आशिया कप 2022, T20 वर्ल्ड कप, भारत-ऑस्ट्रेलिया टेस्ट सीरीज आणि WTC फायनल सारख्या महत्वाच्या सामन्यांना मुकला आहे.
पण आता वर्ल्ड कप आधी टीम इंडियासाठी एक मोठी गुड न्यूज आहे. जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप 2023 मध्ये तुम्हाला खेळताना दिसू शकतो.
घातक यॉर्करे हे त्याचं मुख्य अस्त्र
जसप्रीत बुमराह टीम इंडियाच प्रमुख अस्त्र आहे. त्याने टीम इंडियासाठी मैदानावर नेहमीच महत्वाची भूमिका बजावलीय. टीमला गरज असताना विकेट मिळवून देण्याची त्याची क्षमता आहे. धावा रोखण्याबरोबरच घातक यॉर्करे हे त्याचं मुख्य अस्त्र आहे.
कुठल्या सीरीमध्ये पुनरागमन करणार?
काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडमध्ये जसप्रीत बुमराहच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती. सध्या तो नॅशनल क्रिकेट अकादमीत आहे. तिथे त्याची रिहॅबची प्रोसेस सुरु आहे. आयर्लंड विरुद्ध तीन टी 20 सामन्यांची सीरीज होणार आहे. त्या सीरीजद्वारे जसप्रीत बुमराह मैदानावर पुनरागमन करु शकतो. या सीरीजद्वारे जसप्रीत बुमराहचा फिटनेस लक्षात येईल.
किती तारखेपासून सुरु होणार सीरीज?
जसप्रीत बुमराहकडे चांगली लय आहे. ऑयर्लंड विरुद्ध ऑगस्टमध्ये सीरीज होणार आहे. या सीरीजव्दारे जसप्रीत बुमराह पुनरागमन करु शकतो. जसप्रीत बुमराह NCA मध्ये व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि मेडिकल विभागाचे प्रमुख नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली आहे. दिल्ली कॅपिटल्सच्या टीमसोबत काम केलेले फिजियोथरेपिस्ट एस रजनीकांत सुद्धा आहेत. 18 ऑगस्टपासून आयर्लंड विरुद्ध सीरीज सुरु होणार आहे.
कुठलाही धोका पत्करणार नाही
नितीन पटेल आणि रजनीकांत भारतीय गोलंदाजांना दुखापतीमधून ठीक करण्यासाठी काम करतात. दोघांच बुमराहवर बारीक लक्ष आहे. त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाहीय. जसप्रीत बुमराह तंदुरुस्त होणं टीम इंडियासाठी खूप आवश्यक आहे. कारण आशिया कप नंतर वनडे वर्ल्ड कप आहे.