मुंबई : टीम इंडिय़ाने वर्ष 2021 मध्ये गाबा कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक सीरीज जिंकली होती. या मॅचमध्ये टीम इंडियाकडून एका खेळाडूला डेब्यु करण्याची संधी मिळाली होती. ही टेस्ट मॅच या खेळाडूच्या करियरची पहिली आणि शेवटची टेस्ट मॅच ठरली. या मॅचनंतर हा खेळाडू भारतीय टेस्ट टीममध्ये पुन्हा पुनरागमन करु शकला नाही. महत्वाच म्हणजे गाबा कसोटीत या खेळाडूच प्रदर्शन जबरदस्त होतं.
क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ऑस्ट्रेलियातच या खेळाडूने डेब्यु केला होता. पण आता हा प्लेयर टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतोय.
दूर-दूर पर्यंत टीम इंडियाच्या प्लानमध्ये नाही
या गोलंदाजच नाव आहे टी.नटराजन. त्याने वर्ष 2020 मध्ये आपल्या करीयरची सुरुवात केली. पण आता हा गोलंदाज बाहेर आहे. टी. नटराजन दूर-दूर पर्यंत टीम इंडियाच्या प्लानमध्ये दिसत नाहीय.
पुन्हा कसोटी संघात दिसला नाही
वर्ष 2020-21 मध्ये जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गाबाच्या मैदानात टेस्ट सीरीजमधला शेवटचा सामना खेळला गेला. या मॅचमधून टी नटराजनने डेब्यु केला. पहिल्या इनिंगमध्ये टी. नटराजनने 24.2 ओव्हर्स बॉलिंग केली. 3 विकेट घेतले. ही मॅच टीम इंडियाने 3 विकेटने जिंकली होती. पण या मॅचनंतर टी नटराजन भारतीय कसोटी संघात स्थान मिळवू शकला नाही.
यॉर्कर मॅन म्हणून ओळख
नटराजनने करियरच्या सुरुवातीला यॉर्कर मॅन म्हणून ओळख बनवली होती. नटराजनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तिन्ही फॉर्मेटमध्ये आपला पहिला सामना खेळला. टी नटराजन मार्च 2021मध्ये इंग्लंड विरुद्ध आपला शेवटचा सामना खेळला. नटराजन टीम इंडियासाठी 1 टेस्ट. 4 T20 आणि 2 वनडे इंटरनॅशनल खेळलाय. टी नटराजनने टेस्टमध्ये 3 विकेट, टी 20 इंटरनॅशनलमध्ये 7 विकेट आणि वनडे इंटरनॅशनलमध्ये 3 विकेट काढल्या आहेत.