चेन्नई : भारतात क्रिकेट या खेळाच एक विशेष स्थान आहे. क्रिकेट हा खेळ लोकांना जोडतो. अन्य कुठल्याही खेळाडूंपेक्षा भारतात क्रिकेटपटूंची अमाप लोकप्रियता आहे. क्रिकेटपटूंना याची देहा, याची डोळा पाहण्यासाठी चाहते अनेकदा वाटेल त्या थराला जातात. ज्या प्रमाणे ब्राझीलमध्ये फुटबॉल, त्या प्रमाणे भारतात क्रिकेट. भारतात क्रिकेट एक धर्मासमान आहे. क्रिकेटमध्ये झालेला पराभव देशवासियांच्या जिव्हारी लागतो. सहन होत नाही, याच क्रिकेटच्या बाबतीत सध्या एक वेगळी गोष्ट दिसून येतेय. भारतात 5 ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हटला की, भारतात एक फिव्हर दिसून येतो. सर्वत्र वर्ल्ड कपची चर्चा सुरु असते. पण सध्या मात्र असं चित्र फारस दिसून येत नाहीय. वाहिन्या, स्पॉन्सर क्रिकेटचा हा ज्वर निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. पण खरच असं होतय का?
भारतात टीम इंडियाचा सामना असेल, तर स्टेडियममध्ये पाऊल ठेवायलाही जागा नसते. पण टीम इंडियाच्या पहिल्या वर्ल्ड कप सामन्यात वेगळ चित्र दिसलं. चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये सामना पाहायला लोक भरपूर आले, पण स्टेडियममधल्या बऱ्याच खुर्च्या रिकाम्या होत्या. टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियाचा सामना सुरु झाल्यानंतर स्टेडियममधील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानंतर बीसीसीआयला ट्रोल केलं जातय.
असं होण्यामागे काय कारण आहे?
आता प्रश्न हा निर्माण होतोय की, भारतात वर्ल्ड कप आणि टीम इंडियाचा सामना पहायाला स्टेडियम फुल्ल का नाही? यामागे कारण आहे गर्मी. भारताता आता ऑक्टोंबर हिट सुरु झालीय. चेन्नईमध्ये प्रचंड उकाडा आहे. त्यामुळे लोक संध्याकाळी 5 नंतर स्टेडियममध्ये येणे पसंत करतात. याआधी असं व्हायच नाही. स्टेडियम फुल झालं नाही, यामागे तिकीट विक्रीची खराब व्यवस्था हे सुद्धा एक कारण आहे.
It’s really unfortunate that so many seats are still empty.
The best seats of long on and long off also vacant.
Either we don’t have enough passionate fans to fill the stadium or there has been gross mismanagement of tickets. Make these tickets available please.#INDvsAUS
— Shreya (@shreyamatsharma) October 8, 2023
I’ve never seen Chepauk so empty. Who the hell has all these tickets? #IndvAus pic.twitter.com/ELD7nYPEdY
— Narayanan Hariharan (@narayananh) October 8, 2023
अन्यथा असेच प्रश्न निर्माण होतील
अनेक फॅन्सनी आरोप केला की, आम्ही अधिकृत वेबसाइटवर जाऊन तिकीट बुक करण्याचा प्रयत्न केला. पण तिकीटं मिळाली नाही. चेन्नईत स्टेडियमच्या बाहेर तिकीटं मिळत होती, अशी सुद्धा बातमी होती. वर्ल्ड कपच्या पहिल्या सामन्यापासूनच स्टेडियममधील प्रेक्षक संख्येवरुन चर्चा सुरु झाली आहे. वर्ल्ड कपचा पहिला सामना न्यूझीलंड आणि इंग्लंडमध्ये झाला. अहमदाबादमधील या सामन्यात फार कमी लोक दिसून आले. पण संध्याकाळ होता-होता स्टेडियम भरलं. वर्ल्ड कपचा पहिला सामना स्टेडियमध्ये जाऊन 47518 लोकांनी पाहिला. भारताच्या सामन्याच्यावेळी प्रेक्षक संख्येचा नवीन रेकॉर्ड प्रस्थापित होईल अशी अपेक्षा आहे. अन्यथा बीसीसीआय बद्दल असेच प्रश्न निर्माण होत राहतील.