Shikhar Dhawan : शिखर धवन टीम इंडियातील ‘या’ खेळाडूवर जळायचा, स्वत:च केला खुलासा, VIDEO

| Updated on: Aug 31, 2024 | 9:41 AM

Shikhar Dhawan : रिटायरमेंटनंतर शिखर धवनने एक चक्रावून टाकणारा खुलासा केलाय. टीम इंडियातील एका क्रिकेटपटूकडे पाहून जळफळाट व्हायचा अशी कबुली धवनने दिलीय. त्यामागच कारणही धवनने सांगितलं. नुकतीच शिखर धवनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधुन निवृत्ती स्वीकारली.

Shikhar Dhawan : शिखर धवन टीम इंडियातील या खेळाडूवर जळायचा, स्वत:च केला खुलासा, VIDEO
Shikhar Dhawan
Follow us on

भारताचा दिग्गज ओपनर शिखर धवनने 2010 मध्ये टीम इंडियात पाऊल ठेवलं. 12 वर्ष ओपनर म्हणून जबाबदारी संभाळल्यानंतर त्याने 24 ऑगस्टला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. रिटायरमेंटनंतर धवनने एक चक्रावून टाकणारा खुलासा केलाय. टीम इंडियाचा विद्यमान उपकर्णधार शुभमन गिलकडे पाहून मला जळफळाट व्हायचा अशी कबुली स्वत: धवनने दिलीय. या खुलाशाने सगळेच हैराण झालेत. गिलवर का जळफळाट व्हायचा? त्या मागच कारणही धवनने सांगितलय.

शिखर धवनचा टीम इंडियात दबदबा होता. रोहित शर्मासोबत मिळून त्याने अनेक सामन्यात विजय मिळवून दिला. खासकरुन आयसीसी टुर्नामेंटमध्ये त्याने शानदार प्रदर्शन केलं. 2019 मध्ये शुभमन गिलने टीम इंडियात प्रवेश केल्यानंतर हळूहळून शिखर धवनच महत्त्व कमी होऊ लागलं. गिलने आधी वनडे टीममध्ये प्रवेश केला. त्यानंतर 2020 साली टेस्ट टीमचा भाग बनला. या दरम्यान त्याने अनेक शतक झळकवली. शुभमन गिलला विराट कोहलीचा उत्तराधिकारी मानलं जातं.

धवनने काय सांगितलं?

दुसरीकडे हळूहळू धवनला टीम इंडियात मिळणारी संधी कमी होऊ लागली. त्याला शतकही झळकवता येत नव्हतं. निवृत्तीनंतर शिखरने स्वत: कबुली दिली की, त्याला गिल पटत नव्हता. त्याच्यावर जळफळाट व्हायचा. कारण गिलने दोन्ही फॉर्मेटमध्ये स्वत:च स्थान निर्माण केलं होतं. शतकं सुद्धा त्याने झळकावली. शिखर धवन टीम इंडियात गब्बर म्हणून ओळखला जायचा. गिलच प्रदर्शन पाहून नंतर धवननेच त्याला जास्त संधी मिळाल्या पाहिजेत हे मान्य केलं.


शिखर धवन खेळणार

शिखर धवनने भले निवृत्ती घेतली असेल, पण त्याच्या फॅन्सनी निराश होण्याची गरज नाहीय. कारण धवन क्रिकेट खेळताना दिसेल. सप्टेंबरमध्ये लेजेंड्स लीग क्रिकेटचा तिसरा सीजन होणार आहे. 20 सप्टेंबरपासून ही सीजन सुरु होईल. यात 6 टीम्स असतील. रिटायर्ड क्रिकेटपटूंच्या या लीगमध्ये धवन गुजरातकडून खेळणार आहे. ख्रिस गेलसोबत तो ओपनिंग करताना दिसू शकतो.