T20 World Cup गेल्या T20 वर्ल्ड कपपासून इतकी बदलली टीम इंडिया

| Updated on: Apr 30, 2024 | 6:29 PM

टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. ज्यामध्ये अनेक नव्या खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये सात खेळाडू असे देखील आहेत जे मागच्या टी२० वर्ल्जकपमध्ये खेळत होते. पण यंदा त्यांना संधी मिळालेली नाही. कोण आहेत ते सात खेळाडू जाणून घ्या.

T20 World Cup गेल्या T20 वर्ल्ड कपपासून इतकी बदलली टीम इंडिया
Follow us on

Team India : टीम इंडियाने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली T20 विश्वचषक 2007 चे विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर भारतीय संघाला आजपर्यंत ही ट्रॉफी जिंकता आलेली नाही. BCCI ने T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघात 15 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. पण 2022 च्या T20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या 7 खेळाडूंचा यावेळी समावेश करण्यात आलेला नाही. 2022 च्या टी-20 विश्वचषकात टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचली होती. पण त्यानंतर संघाला इंग्लंडविरुद्ध 10 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता.

सात खेळाडू बाहेर

केएल राहुल 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा उपकर्णधार होता. पण यावेळी तो संघाबाहेर गेला आहे. आता हार्दिक पांड्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आली आहे. T20 विश्वचषक 2022 मध्ये असे 7 खेळाडू खेळत आहेत, ज्यांना यावेळी टीम इंडियामध्ये संधी मिळालेली नाही. यामध्ये केएल राहुल, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल, दिनेश कार्तिक यांचा समावेश आहे. मोहम्मद शमी दुखापतीमुळे खेळत नाहीये. तो आयपीएल 2024 मध्ये खेळत नाहीये. अश्विन, दीपक हुडा आणि हर्षल पटेल खराब फॉर्ममध्ये आहेत. त्यांना त्यांना देखील बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

T20 विश्वचषक 2022 मधील भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), दिनेश कार्तिक, विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, रविचंद्रन अश्विन, दीपक हुडा, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, हर्षल पटेल.

यशस्वी जैस्वालला पहिल्यांदाच संधी

निवडकर्त्यांनी 2024 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा केली आहे. संघाचा कर्णधार रोहित शर्मा आहे. संघात युवा आणि अनुभवी खेळाडूंचा समावेश आहे. यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन, मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल हे प्रथमच टी-२० विश्वचषकात खेळताना दिसणार आहेत. चहलला टी-20 विश्वचषक 2022 मध्येही संधी मिळाली. मात्र तो एकही सामना खेळू शकला नाही.

T20 विश्वचषक 2024 साठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

राखीव खेळाडू

रिंकू सिंग, शुभमन गिल, खलील अहमद आणि आवेश खान