Team India | हेडकोच राहुल द्रविड यांची सूचना टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू गांभीर्याने घेतो. भारतीय क्रिकेटमध्ये राहुल द्रविड यांना एक मानाच, आदराच स्थान आहे. राहुल द्रविड स्वत: एक उत्तम फलंदाज होते. फलंदाजीच तंत्र त्यांना उत्तमरित्या अवगत होतं. टीम इंडियाच नेतृत्व करण्याचा अनुभवही त्यांच्याकडे होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्यांनी भरपूर नाव कमावल. त्यांच्या याच अनुभवाचा फायदा आता टीम इंडियाला होतोय. राहुल द्रविड अनेकदा नेट्समध्ये खेळाडूंशी चर्चा करतात. त्यांना काही टीप्स देतात, बारकावे समजावतात. राहुल द्रविड क्रिकेटमधील एक विद्यापीठ असल्याने टीम इंडियातील प्रत्येक खेळाडू त्यांच्याकडून काहीतरी शिकण्यासाठी उत्सुक्त असतो. त्यांची प्रत्येक सूचना गांभीर्याने घेऊन त्यावर अमलबजावणी करतो. पण सध्या भारतीय क्रिकेट संघातील एका खेळाडूने त्यांची सूचना गांभीर्याने घेतलेली दिसत नाहीय. राहुल द्रविड यांनी त्याला जो सल्ला दिलाय, त्याकडे त्याने दुर्लक्ष केल्याच दिसून येतय.
सध्या हा प्लेयर टीम इंडियातून बाहेर आहे. त्याच्या टॅलेंटबद्दल कुठलीही शंका नाहीय. त्याला टीमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवायच असेल, तर राहुल द्रविड यांच्या सूचनेच पालन कराव लागेल, अन्यथा त्याचा मार्ग बिकट आहे. टीम इंडियाचा हा प्लेयर आहे इशान किशन. त्याने रणजी ट्रॉफीमध्ये खेळण्यासाठी अजून आपली उपलब्धता कळवलेली नाहीय. झारखंड क्रिकेट असोशिएशनला इशानने अजून रणजी स्पर्धेत खेळणार कि, नाही? या बद्दल काही सांगितलेलं नाहीय. राष्ट्रीय संघात पुनरागमन करण्यासाठी इशान किशनला देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी त्याला निवडलं नाही. त्याशिवाय भारत विरुद्ध अफगाणिस्तान T20 सीरीजसाठी सुद्धा त्याच्या नावाचा विचार झालेला नाही.
त्याची दुबईमध्ये पार्टी
इशानने उपलब्ध आहे, म्हणून सांगितलं, तर त्याचा थेट प्लेइंग 11 मध्ये समावेश होईल असं झारखंड क्रिकेट असोशिएशनच्या सचिवाने सांगितलं. इशान किशनला टीममधून वगळण हा वादाचा मुद्दा बनला आहे. मानसिक थकव्याच कारण देऊन इशान किशनने स्वत: दक्षिण आफ्रिका सीरीजमधून माघार घेतली. इशान किशन दुबईमध्ये पार्टी करताना दिसला आहे. इशान किशनबद्दल बोलताना राहुल द्रविड म्हणाले होते की, “दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजसाठी त्याने ब्रेक मागितला. आम्ही त्याला सपोर्ट केला. मला विश्वास आहे, जेव्हा तो उपलब्ध होईल तेव्हा क्रिकेट खेळेल. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळून तो राष्ट्रीय संघात पुनरागमन करेल” इशान किशनने राहुल द्रविड यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष केल्याच दिसतय.