मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट टीम वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तेच महिला क्रिकेट टीम बांग्लादेश दौऱ्यावर रवाना होणार आहे. दोन्ही टीम परदेश दौऱ्यावर असताना टीम इंडियाच्या हेड कोच आणि चीफ सिलेक्टर संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. भारतीय महिला क्रिकेट टीमचे हेड कोच आणि भारतीय पुरुष क्रिकेट टीमच्या चीफ सिलेक्टरच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते. सध्या ऑनलाइन आणि ऑफ लाइन दोन्हीसाठी इंटरव्यू सुरु आहेत.
BCCI ची क्रिकेट सल्लागार समिती या दोन्ही महत्वाच्या पदांसाठी इंटरव्यू घेत आहे. 3 जुलैच्या मुलाखतीमधून काही निष्कर्ष निघाला नव्हता. 4 जुलैला सुद्धा इंटरव्यू सुरु राहतील, इंटरव्यूनंतर CAC आज 4 जुलैलाच नवीन नावाची घोषणा करण्याची शक्यता आहे.
कोचसाठी तिघांचा इटरव्यू
BCCI च्या क्रिकेट सल्लागार समितीने भारतीय महिला क्रिकेट टीमच्या हेड कोच पदासाठी तीन नाव शॉर्टलिस्ट केली होती. यात भारतीय महिला क्रिकेट टीमला 2017 साली वनडे वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत घेऊन जाणारे तुषार अरोठे आहेत. दुसरे अमोल मजुमदार आणि तिसरे इंग्लंडचे जॉन लुईस आहेत. अमोल मजुमदार मुंबईचे माजी कोच आहेत. त्याशिवाय देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रदीर्घ अनुभव त्यांच्याकडे आहे.
कोणाचा इंटरव्यू ऑफलाइन
CAC च्या 3 सदस्यीय समितीमध्ये सुलक्षणा नाइक, अशोक मल्होत्रा आणि जतीन परांजपे यांचा समावेश आहे. त्यांनी सर्वाचे इंटरव्यू घेतले. अमोल मजूमदार महिला टीमचे हेड कोच बनण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे. मजूमदार यांचा इंटरव्यू ऑफलाइन झाला. अन्य दोघांचे इंटरव्यू ऑनलाइन झाले.
कोणाचं नाव आघाडीवर?
क्रिकबजच्या रिपोर्ट्नुसार महिला क्रिकेट टीमचा हेड कोच आणि पुरुष क्रिकेट टीमच्या हेड कोचच्या नावाची घोषणा एकत्र होऊ शकते. चेतन शर्मा यांना हटवल्यापासून भारतीय पुरुष क्रिकेट टीमच चीफ सिलेक्टर पद रिक्त आहे. अजित आगरकर या शर्यतीत आघाडीवर आहेत.