IND vs NZ | वानखेडेवर ‘त्या’ टीम फायद्यात राहतात, म्हणून रोहितने टॉस जिंकल्यावर पहिली करावी एकच गोष्ट

| Updated on: Nov 13, 2023 | 9:35 AM

IND vs NZ | वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये वानखेडे स्टेडियमवर आतार्यंत जितके सामने झालेत, तो रेकॉर्ड काय सांगतो?. टीम इंडियाने दिमाखात उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. काल बंगळुरुत टीम इंडियाने नेदरलँडला 160 धावांनी हरवलं. लीग स्टेजमधील हा शेवटचा सामना होता. वानखेडेवर टीम इंडियासमोर काय चॅलेंजेस असणार ते समजून घ्या.

IND vs NZ | वानखेडेवर त्या टीम फायद्यात राहतात, म्हणून रोहितने टॉस जिंकल्यावर पहिली करावी एकच गोष्ट
वर्ल्ड कप सेमी फायनलमध्ये भारताचा न्यूझीलंडसोबत होणार आहे. या सामन्याला काही तास बाकी असून हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर होणार आहे. भारताला मागील वर्ल्ड कपमध्ये किवींनीच बाहेरचा रस्ता दाखवला होता. त्यामुळे रोहितसेना काहीशी दबावात असणार आहे.
Image Credit source: AFP
Follow us on

मुंबई : टीम इंडियाच वर्ल्ड कप 2023 मध्ये साखळी फेरीत शानदार प्रदर्शन कायम आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 9 सामने जिंकले आहेत. लीग स्टेजमधील शेवटच्या सामन्यात बंगळुरुत टीम इंडियाने नेदरलँडला 160 धावांनी हरवलं. टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाने प्रत्येक सामना आरामात जिंकलाय. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे. याच न्यूझीलंडने टीमने मागच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला बाहेरचा रस्ता दाखवला होता. टीम इंडियाकडे जुन्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याची संधी चालून आली आहे. न्यूझीलंडकडे चांगली टीम आहे. मुंबंईत वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यात न्यूझीलंडची टीम भारतीय संघाच्या मार्गातील मोठा अडथळा ठरु शकते.

बुधवारी 15 नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर टुर्नामेंटमधील पहिला सेमीफायनल सामना होणार आहे. याच मैदानावर 12 वर्षांपूर्वी टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी या मैदानावर वर्ल्ड कप जिंकण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडणार आहे. चालू वनडे वर्ल्ड कपमध्ये भारताने वानखेडे स्टेडियमवर एक सामना खेळलाय. 2011 च्या वनडे वर्ल्ड कपचे उपविजेते श्रीलंकेला 55 धावात गुंडाळून 302 धावांनी मोठा विजय मिळवला. टीमची कामगिरी आणि सध्याचा फॉर्म पाहता टीम इंडिया विजेतेपदासाठी प्रबळ दावेदार आहे. पण मार्ग बिलकुल सोपा नाहीय.

वानखेडेवर त्या टीम फायद्यात राहतात

वानखेडेवर होणाऱ्या सामन्याचा रिझल्ट टॉस कोण जिंकणार? यावरही बऱ्याच प्रमाणात अवलंबून असेल. टॉस जिंकल्यावर निर्णय काय होतो? ते सुद्धा महत्त्वाच आहे. वर्ल्ड कप 2023 मध्ये वानखेडेवर ज्या टीम्सनी टॉस जिंकून पहिली बॅटिंग केलीय, ते फायद्यात राहिले आहेत. ज्या टीम्सनी क्षेत्ररक्षण स्वीकारल त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वानखेडेवर सेमीफायनलआधी 4 सामने खेळले गेले आहेत. या चारही सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या टीम्सनी मोठी धावसंख्या उभारली. अपवाद फक्त अफगाणिस्तान-ऑस्ट्रेलिया सामन्याचा. या मॅचमध्ये अफगाणिस्तानने टॉस जिंकून पहिली फलंदाजी स्वीकारली होती, मात्र त्यांचा पराभव झाला. ग्लेन मॅक्सवेलची डबल सेंच्युरी त्याची थक्क करणारी इनिंग यामुळे दुसरी बॅटिंग करुनही ऑस्ट्रेलियन टीम जिंकली.

वानखेडेवर टॉस का महत्त्वाचा?

वानखेडेवर टॉस जिंकल्यानंतर पहिली बॅटिंग करणं का आवश्यक आहे? ते समजून घ्या. वानखेडेवर नव्या चेंडूने नेहमीच वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये वेगवान गोलंदाज खूपच प्रभावी ठरतात. पहिली बॅटिंग स्वीकारल्यानंतर पहिल्या 5-6 ओव्हरनंतर स्थिती सामान्य होते. दुसऱ्या इनिंगमध्ये वेगवान गोलंदाजांना मात्र जास्तकाळ मदत मिळते. पेसर्स स्विंग आणि सीमच्या मदतीने फलंदाजांची डोकेदुखी वाढवतात. कारण संध्याकाळच्यावेळी हलकी हवा असते.

1 ते 10 ओव्हर्स कुठल्या संकटापेक्षा कमी नाहीत

या मैदानावर दुसऱ्या इनिंगमध्ये बॅटिंग करणं नेहमीच कठीण राहिलं आहे. पावरप्लेच्या 1 ते 10 ओव्हर्स कुठल्या संकटापेक्षा कमी नसतात. या मैदानात 4 सामन्यात पावरप्लेमध्ये एकूण 17 विकेट गेले आहेत. यात बहुतांश विकेट या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. टीम इंडिया चांगल्या फॉर्ममध्ये आहे मान्य, पण दुसऱ्या इनिंगमध्ये ट्रेंट बोल्ट आणि टिम साऊदीच्या स्विंग गोलंदाजीचा सामना करणं सोप नाहीय.