IND vs SA Test | भारतीय टीमला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत पराभवाचा सामना करावा लागला. दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियाला एक डाव आणि 32 धावांनी हरवलं. त्याचबरोबर टीम इंडियाच दक्षिण आफ्रिकन भूमीवर कसोटी मालिका जिंकण्याच स्वप्न भंग पावलं. सेंच्युरियनवर फलंदाज फ्लॉप ठरले. शुभमन गिलबद्दल पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालय.
वर्ष 2023 मध्ये वनडेत शुभमन गिलपेक्षा जास्त धावा कोणी केलेल्या नाहीत. त्या रेकॉर्डच्या आधारावर शुभमन गिलला भारतीय क्रिकेटच प्रिन्स म्हटल जाऊ लागलं. पण टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिल अजूनपर्यंत अशी कुठलीही कमाल करु शकलेला नाही. टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिल प्रिन्स म्हण्यापासून खूप लांब आहे.
गिलबद्दल हा प्रश्न निर्माण होण स्वाभाविक
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सेंच्युरियन कसोटीत पहिल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये शुभमन गिलने 2 आणि 26 धावाच केल्या. टेस्ट क्रिकेटमध्ये शुभमन गिलच्या परफॉर्मन्समध्ये सातत्याने घसरण होतेय. त्याच्या बॅटमधून फक्त मायदेशात धावा निघाल्या आहेत. त्यामुळे शुभमन गिल फक्त भारतातच खेळणार का? हा प्रश्न निर्माण होण स्वाभाविक आहे.
रिप्लेसमेंट म्हणून जागा कधी भरुन काढणार?
शुभमन गिलला टेस्टमध्ये संधी मिळाली, तेव्हा त्याने ओपनर म्हणून सुरुवात केली. यशस्वी जैस्वाल आल्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये नंबर 3 वर संधी मिळाली. चेतेश्वर पुजाराची रिप्लेसमेंट म्हणूनही शुभमन गिलला तयार केलं जातय. पण अजून शुभमन अपेक्षित कामगिरी कसोटीमध्ये करु शकलेला नाही.
टेस्टमध्ये शुभमनच्या किती सेंच्युरी?
आकडे सुद्धा याची साक्ष देतात. मागच्या 19 कसोटी सामन्यात 35 इनिंगमध्ये शुभमनने 994 धावा केल्या. त्यावेळी शुभमनची सरासरी फक्त 31.06 होती. वनडेमध्ये गिलची फलंदाजी सरासरी 61 ची आहे. 44 सामन्यात त्याच्या 2271 धावा आहेत. विराट कोहलीचा उत्तराधिकारी म्हणून त्याच्याकडे पाहिल जातं. वनडेमध्ये शुभमनच्या नावावर 6 सेंच्युरी आहेत, तेच टेस्टमध्ये त्याच्या खात्यात दोन शतक आहेत.
टेस्टमध्ये शुभमनच्या शेवटच्या 10 इनिंग
26, 2, 29, 10, 6, 18, 13, 128, 5, 21,