टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. दिल्लीतून मुंबईपर्यंत प्रवासात भारतीय संघाला जनतेचे भरभरुन प्रेम मिळाले. या प्रेमाने भरावलेल्या भारतीय संघाने थँक्यू इंडिया…म्हणत भारतीय जनतेचे आभार मानले. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईत तुफान गर्दी झाली होती. लाखोच्या संख्येने क्रिकेटप्रेमी रस्त्यावर उतरले होते. यामुळे विजयाची रॅलीत धक्कादायक घटनाही घडली. नरिमन पॉइंट्स ते वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी रॅली निघाली होती. क्रिकेट चाहत्यांची गर्दी काहीशी अनियंत्रित झाली. त्यामुळे अनेकांना गुदमरले. अनेकांच्या हातापायाला दुखापत झाली. यातील काहींना व्हीटी येथील जीटी रुग्णालय येथे आणण्यात आले आहे. या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
टीम इंडियाच्या स्वागतासाठी लाखोच्या संख्येने क्रिकेट प्रेमी रस्त्यावर उतरले होते. त्यामुळे एक धक्कादायक घटना समोर आली. वानखेडे स्टेडियमवर बाहेर लाखोंच्या संख्येने आलेले क्रिकेट चाहत्यांची गर्दी काहीशी अनियंत्रित झाली. त्यामुळे अनेकांना गुदमरले. काही जणांना श्वास घेणेही अवघड झाले होते.
तसेच अनेकांच्या हातापायाला दुखापत झाली. यातील काहींना व्हीटी येथील जीटी रुग्णालय येथे दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असून काहींना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर काहींवर अजून उपचार सुरू आहेत. त्यांची स्थिती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
टीम इंडियाच्या विजयी रॅलीत धक्काबुक्की, अनेकांचा श्वास गुदमरला… pic.twitter.com/S7t77srL5Y
— jitendra (@jitendrazavar) July 5, 2024
टी 20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर मुंबईत टीम इंडियाची विजय रॅली निघाली. भारतीय संघातील खेळाडूंसाठी एक खास बस तयार करण्यात आली आहे. या विजयी रॅलीस पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीवर नियंत्रण करणे पोलिसांना अवघड झाले. यामुळे लाठीमार करावा लागला. मुंबईतील वानखेडे स्टेडियमची क्षमत ३५ ते ४० हजार आहे. परंतु त्यापेक्षा कितीतरी जास्त गर्दी त्या ठिकाणी झाली होती. अनेक चाहते स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत होते. वानखेडे स्टेडियम गेट नंबर २ येथे चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लाठीमारही केला.