हैदराबाद: टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये उद्यापासून वनडे सीरीज सुरु होणार आहे. या महत्त्वाच्या मॅचआधी टीम इंडियाचे खेळाडू एका पार्टीत रमले होते. मोठ्या मॅचआधी खेळाडूंना रिलॅक्स होण्यासाठी अशा प्रकारच आयोजन कधी, कधी आवश्यक असतं. तेलगु सुपरस्टार ज्यूनियर एनटीआरच्या पार्टीला टीम इंडियाचे खेळाडू उपस्थित होते. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यूनियर एनटीआरच्या ‘RRR’ चित्रपटाला गोल्डन ग्लोब अवॉर्ड मिळाला. त्यासाठी ही ज्यूनियर एनटीआरने हैदराबादमध्ये ही पार्टी ठेवली होती. ‘RRR’ चित्रपटातील नाटू, नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार मिळाला. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध वनडे सामन्यासाठी हैदराबादमध्ये आहे. हा योगाय़ोग जुळून आल्याने टीम इंडियाचे खेळाडू या पार्टीला हजर होते. या पार्टीच्या निमित्ताने क्रिकेट आणि टॉलिवूड एकत्र आलं होतं.
रोहित-विराटने पार्टीकडे फिरवली पाठ
ज्यूनियर NTR च्या फॅन्सनी त्याचे टीम इंडियाच्या क्रिकेटपटूंसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेयर केले. सूर्यकुमार यादव, इशान किशन, युजवेंद्र चहल, शार्दुल ठाकूर आणि शुभमन गिल या पार्टीला हजर होते. एकाफोटोमध्ये भारतीय खेळाडूंच्या मागे महागड्या गाड्या दिसत आहेत. या सर्व ज्यूनियर एनटीआरच्या कार असण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी ज्यूनियर NTR च्या पार्टीकडे पाठ फिरवली.
It was so lovely meeting you, brother!
Congratulations once again on RRR winning the Golden Globe award ? pic.twitter.com/6HkJgzV4ky— Surya Kumar Yadav (@surya_14kumar) January 17, 2023
#ManOfMassesNTR @tarak9999 with Indian Cricket Team Players @surya_14kumar @ishankishan51 @yuzi_chahal @imShard @ShubmanGill ??? pic.twitter.com/V4gr1US0ZP
— NTR Fans (@NTR2NTRFans) January 16, 2023
सूर्याने टि्वट केला फोटो
एकाफोटोमध्ये ज्यूनियर एनटीआर, सूर्यकुमार यादव आणि त्याची पत्नी देविशा शेट्टी दिसत आहेत. सूर्यकुमारने हा फोटो त्याच्या टि्वटरव शेअर केलाय. ‘तुला भेटून आनंद झाला भावा’ असं सूर्याने म्हटलय. गोल्डन ग्लोबमध्ये RRR ला यश मिळाल्याबद्दल अभिनंदन असं सूर्याने त्याच्या टि्वटमध्ये मह्टलं आहे.
‘नाटू नाटू’ या गाण्याची कोरिओग्राफी कोणी केली?
‘नाटू नाटू’ या गाण्यावरील डान्सची कोरिओग्राफी प्रेम रक्षितने केली आहे. या गाण्याला कोरिओग्राफ करायला प्रेम रक्षित यांना दोन महिने लागले. या संपूर्ण गाण्यात त्याने रामचरण आणि ज्युनिअर एनटीआरसाठी 110 स्टेप्स तयार केले होते. या संपूर्ण प्रवासात राजामौली यांनी खूप साथ दिल्याचं त्याने म्हटलं आहे.