Team India | दुधातून माशीसारखं सिलेक्टर्सनी बाहेर केलं, त्यानेच आता बॅटने दिलं जोरदार प्रत्युत्तर

| Updated on: Jul 13, 2023 | 11:22 AM

Team India | टीम इंडियासाठी अवघड परिस्थितीत या प्लेयरने नेहमीच किल्ला लढवला आहे. त्याच्या वाट्याला परदेशातील कसोटी मालिका आल्या. त्याला नांगर टाकून फलंदाजी करावी लागली.

Team India | दुधातून माशीसारखं सिलेक्टर्सनी बाहेर केलं, त्यानेच आता बॅटने दिलं जोरदार प्रत्युत्तर
Team India
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : भारतीय टीममधून सिलेक्टर्सनी एका प्लेयरला अचानक बाहेर केलं. आता तोच प्लेयर देशांतर्गत क्रिकेमध्ये धुमाकूळ घालतोय. फॅन्सच्या मते, सिलेक्टर्सनी त्या प्लेयरला पुन्हा टीम इंडियात संधी दिली पाहिजे. टीम इंडियासाठी अवघड परिस्थितीत या प्लेयरने नेहमीच किल्ला लढवला आहे. त्याच्या वाट्याला परदेशातील कसोटी मालिका आल्या. टीम इंडियाचा डाव गडगडलेला असताना त्याला नांगर टाकून फलंदाजी करावी लागली.

सध्या हा प्लेयर दुलीप ट्रॉफी फायनलमध्ये साऊथ झोनकडून खेळतोय. त्याने या मॅचमध्ये एकट्याने वेस्ट झोनच्या फलंदाजांचा समाचार घेतला. फायनलमध्ये वेस्ट झोनची बाजू वरचढ आहे.

गोलंदाजांच चांगलं प्रदर्शन

टीम इंडियाच्या ज्या खेळाडूबद्दल आम्ही बोलतोय, त्याच नाव आहे हनुमा विहारी. साऊथ झोनकडून हनुमा विहारीने किल्ला लढवला. पण वेस्ट झोनच्या गोलंदाजांनी चांगल प्रदर्शन केलं. पहिल्या दिवशी साऊथ झोनच्या 7 बाद 182 धावा झाल्या आहेत.

पहिल्यादिवशी किती ओव्हर्सचा खेळ?

वेस्ट झोनने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. आकाशात ढग दाटून आले होते, त्याचा वेस्ट झोनच्या गोलंदाजांनी फायदा उचलला. खराब प्रकाश आणि पावसामुळे बुधवारी फक्त 65 ओव्हर्सचा खेळ झाला. कॅप्टन हनुमा विहारीने 130 चेंडूत 63 धावा, त्याने साऊथ झोनकडून टिकून फलंदाजी केली.

मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही

नागवसवाला, चिंतन गजा आणि अतीत सेठ या गोलंदाजाच्या तिकडीने साऊथ झोनच्या फलंदाजांना चांगलाच त्रास दिला. तिन्ही गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. साऊथ झोनचे ओपनर्स मयंक अग्रवाल (28) आणि आर. समर्थ (7) यांना मोकळेपणाने फलंदाजी करु दिली नाही.

7000 धावा पूर्ण

साऊथ झोनकडून खेळणाऱ्या मयंक अग्रवालने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 7000 धावा पूर्ण केल्या. अग्रवालला अतीत सेठने तिसऱ्या स्लीपमध्ये सर्फराज खानकरवी कॅच आऊट केलं. साऊथ झोनचे दोन्ही ओपनर्स 42 धावात तंबूत परतले होते. तिलक आणि विहारीने यानंतर इनिंग संभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 79 धावा जोडल्या.

3 तास खेळपट्टीवर पाय रोवून उभा

विहारी 3 तास खेळपट्टीवर पाय रोवून उभा होता. त्याने वेस्ट झोनच्या गोलंदाजांचा नेटाने सामना केला. हनुमा विहारी 63 रन्सनवर आऊट झाला. रिकी भुई (9), सचिन बेबी (7) आणि साई किशोर (5) दोन आकडी धावांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. दिवसाचा खेळ संपताना व़ॉशिंग्टन सुंदर 9 आणि विजयकुमार 5 रन्सवर खेळत होते.