Virat Kohli | विराटच्या पाकिस्तानी फॅनच मन मोडलं, आशिया कपनंतर रडत व्यक्त केलं दु:ख, VIDEO

| Updated on: Sep 23, 2023 | 9:23 AM

Virat Kohli | टीम इंडियाने आशिया कप 2023 मध्ये पाकिस्तानला धुळ चारली. आता वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये पुन्हा पाकिस्तानची तीच हालत करण्याचा टीम इंडियाचा उद्देश असेल. या दरम्यान एक पाकिस्तानी फॅन निराश झालीय.

Virat Kohli | विराटच्या पाकिस्तानी फॅनच मन मोडलं, आशिया कपनंतर रडत व्यक्त केलं दु:ख, VIDEO
Virat Kohli Pakistani Fan
Follow us on

लाहोर : आशिया कप 2023 दरम्यान पाकिस्तानच्या एक महिला फॅनची खूप चर्चा होती. स्वत:ला ती विराट कोहलीची मोठी फॅन म्हणवते. इन्स्टाग्रामवर सतत रील पोस्ट करत असते. आशिया कपमधून पाकिस्तानी टीम आऊट झाली. मात्र, तरीही लवखानी कोलंबोत भारत-श्रीलंका फायनल सामना पाहण्यासाठी पोहोचली. मीडियासमोर तिने स्पष्ट सांगितलं, बाबर आजम आणि विराट कोहलीमध्ये कोणाला निवडायच असेल, तर माझी पसंती नेहमीच कोहलीला असेल. चेहऱ्यावर भारताचा तिरंगा आणि हास्य ठेवून व्हिडिओ पोस्ट करणाऱ्या पाकिस्तानी महिला फॅनचा एक लेटेस्ट रील व्हायरल होतोय. त्यात ती रडताना दिसतेय. लवखानीला 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरु होणारी वर्ल्ड कप स्पर्धा पाहण्यासाठी यायच आहे. तिने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यात तिने 14 ऑक्टोबरला होणारा भारत विरुद्ध पाकिस्तान सामना पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. कुठला भारतीय मला तिथे बोलवेल का? असं लवखानीने विचारलं होतं.

पण आता मात्र पाकिस्तानी फॅनच मन मोडल्याच दिसतय. वर्ल्ड कप पाहण्यासाठी लवखानीला कुठलाही भारतीय बोलवत नाहीय. दरम्यान तिने एक लेटेस्ट व्हिडिओ शेअर केलाय. त्यात तिने मन मोडल्याचा इमोजी शेअर केलाय. ‘मला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळत नाहीय’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. विराट कोहलीच्या या जबरदस्त पाकिस्तानी फॅनचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. लोक त्यावर भरपूर कमेंट करतायत. लवखानीला स्वत: कमेंट केलीय. ‘डोळ्यात अश्रू आले. भरपूर दु:ख झालं’


पुन्हा तशीच हालत करण्याचा इरादा

आशिया कप 2023 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. भारताने पाकिस्तानवर दणदणीत एकतर्फी विजय मिळवला. तब्बल 228 धावांनी मॅच जिंकली. आता वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानची पुन्हा तशीच हालत करण्याचा टीम इंडियाचा इरादा आहे. 14 ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-पाकिस्तान वर्ल्ड कपमधील महामुकाबला होणार आहे.