IND vs NZ 1st T20 : न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या T20 सामन्यात टीम इंडियाचा 21 धावांनी पराभव झाला. या पराभवानंतर टीम इंडिया स्पिन गोलंदाजी खेळणं विसरली आहे का? असा प्रश्न फॅन्स आणि दिग्गज विचारतायत. रांचीच्या पहिल्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडच्या फिरकी गोलंदाजांनी टीम इंडियाचा निम्मा संघ गारद केला. त्यामुळे हा प्रश्न विचारला जातोय. ऑफ स्पिनर मायकल ब्रेसवेल, कॅप्टन आणि लेफ्ट आर्म स्पिनर मिचेल सँटनर आणि लेग स्पिनर इश सोढीने मिळून टीम इंडियाच्या 5 विकेट काढल्या. या स्पिनर्ससमोर भारतीय फलंदाज हतबल दिसले.
त्याने जखडून ठेवलं
ब्रेसवेल आणि सँटनरने मिळून आपल्या कोट्यातील प्रत्येकी 4-4 ओव्हर टाकल्या. ब्रेसवेलने 31 आणि सँटनरने 11 धावा दिल्या. दोघांनी 2-2 विकेट काढल्या. इश शोढी थोडा महागडा ठरला. त्याने 3 ओव्हरमध्ये 30 रन्स देऊन एक विकेट काढला. सँटनरने आपल्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाजांना अजिबात मोकळेपणे फलंदाजी करु दिली नाही. त्याने जखडून ठेवलं.
अर्शदीप सिंहला मेडन ओव्हर टाकली
सँटनरने T20 क्रिकेटमधील नंबर 1 फलंदाज सूर्यकुमार यादवला अख्खी मेडन ओव्हर खेळवली. हार्दिक पंड्या आणि तो क्रीजवर असताना सँटनरे इतकी उत्कृष्ट बॉलिंग केली. वेगवान गोलंदाज लॉकी फर्ग्युसनने अर्शदीप सिंहला मेडन ओव्हर टाकली.
स्पिनर्सचा बोलबाला
मँचमध्ये सँटनरने शुभमन गिल आणि दीपक हुड्डाची विकेट काढली. ब्रेसवेलने इशान किशन आणि कॅप्टन हार्दिक पंड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. इश सोढीने जबरदस्त बॅटिंग करणाऱ्या सूर्यकुमार यादवची विकेट काढली. या मॅचमध्ये भारताकडूनही स्पिनर्सच प्रभावी ठरले. वॉशिंग्टन सुंदरने 4 ओव्हरमध्ये 22 धावा देऊन 2 विकेट काढल्या. कुलदीप यादवने 4 ओव्हरमध्ये 20 रन्स देऊन एक विकेट काढला.