Ind Vs Eng | छोट्या रोलरची मोठी चाल, इंग्लंड हरणार, रोहितने शेवटच्या 15 मिनिटात असा फिरवला गेम

| Updated on: Feb 26, 2024 | 10:13 AM

Ind Vs Eng | इंग्लंडने भारताला टेस्ट मॅचमधील विजयासाठी 192 धावांच लक्ष्य दिलं आहे. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना 40 धावा केल्या आहेत. आता चौथ्या दिवशी फक्त 152 धावा बनवायच्या आहेत. टीम इंडियाचे 10 विकेट बाकी आहेत.

Ind Vs Eng | छोट्या रोलरची मोठी चाल, इंग्लंड हरणार, रोहितने शेवटच्या 15 मिनिटात असा फिरवला गेम
rohit sharma hitman
Follow us on

Ind Vs Eng | रांची टेस्ट मॅचच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसाच्या खेळात बरच काही बदललय. टीम इंडिया तिसऱ्या दिवसाच्या खेळात जवळपास 200 धावांनी पिछाडीवर पडणार होती. पण तिसऱ्या दिवसाचा खेळ संपताना टीम इंडियाला विजयापासून फक्त 152 धावा दूर आहे. तिसऱ्यादिवसाच्या शेवटच्या 15 मिनिटात जे झालं, कॅप्टन रोहित शर्माने जो निर्णय घेतला, त्यामुळे इंग्लंडची टीम हैराण आहे. त्यांचा पराभव पक्का आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ संपण्याच्या काहीवेळ आधी इंग्लंडची टीम ऑलआऊट झाली. भारतीय टीमला फलंदाजीला मैदानात उतराव लागलं. खरा खेळ शेवटच्या 15 मिनिटात झाला. कारण, रोहित शर्माने टीम इंडिया बँटिगसाठी उतरण्याआधी पीचवर रोलर फिरवून घेतला.

इंग्लंडच्या हातून संधी निसटली

रोहित शर्माने टीम इंडियाच्या बॅटिंगआधी पीचवर हलका रोलर फिरवून घेतला. टीम इंडिया बॅटिंगला उतरणार होती, त्यामुळे हे शक्य झालं. कारण इंग्लंडची टीम फलंदाजी करत असती, तर रोलर फिरवण्याचा अधिकार त्यांच्याकडे असता. ते हलका नाही, तर पीचवर हेवी रोलिंग करु शकले असते. कारण हेवी रोलिंगमुळे पीचला तडे जातात, त्याचा फायदा इंग्लिश स्पिनर्सना मिळू शकला असता.

फायद्यामागे हा नियम

पण दिवसाचा खेळ संपण्याच्या 15 मिनिट आधी इंग्लंडची टीम ऑलआऊट झाल्यामुळे त्यांना फायदा उचलता आला नाही. आता चौथ्या दिवशी टीम इंडियाला फलंदाजीला उतरेल, तेव्हा पीच इतका खराब झालेला नसेल. टीम इंडियाला हा जो फायदा मिळाला, त्यामागे क्रिकेट पीचशी संबंधित नियम आहे.


एमसीसीचा नियम काय?

एमसीसीचा पीचवर रोलर फिरवण्यासाठी एक नियम आहे. नियम 9.1.1 नुसार, इनिंग सुरु होण्याआधी फलंदाजी करणाऱ्या टीमच्या कॅप्टनकडे रोलिंगचा अधिकार असतो. तो आपल्या मर्जीने पीचवर रोलर फिरवू शकतो. हा रोलर 7 मिनिटापर्यंत फिरवता येतो. रोलिंग मोठी हवी कि, छोटी? हे फलंदाजी करणाऱ्या टीमचा कॅप्टनच ठरवू शकतो.