मुंबई : पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे आशिया कपच आयोजन करणार आहे. अजून आशिया कपला दोन महिने आहेत. यावेळी आशिया कप वनडे फॉर्मेटमध्ये खेळली जाणार आहे. 5 ऑक्टोबरपासून वर्ल्ड कपला सुरुवात होईल. वर्ल्ड कपच यजमानपद भारताकडे आहे. आयसीसी टुर्नामेंटआधी टीम इंडियाला मोठा झटका बसू शकतो.
केएल राहुलबद्दल एक महत्वाची अपडेट आहे. तो पूर्णपणे रिकव्हर होण्याच्या मार्गावर आहे. राहुल लवकरच मॅच फिट होऊन पुनरागमन करु शकतो. त्याशिवाय श्रेयस अय्यरही रिकव्हरीच्या मार्गावर आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 आशिया कप प्रॅक्टिसच्या दृष्टीने महत्वाची स्पर्धा आहे. आशिया कपमध्ये ही जोडी पुनरागमन करेल, अशी बीसीसआयला अपेक्षा आहे.
वर्ल्ड कपपर्यंत तो फिट होणार नाही
बीसीसीआयच्या मेडीकल टीमला श्रेयस अय्यरची चिंता आहे. तो वर्ल्ड कपपर्यंत फिट होणार नाही, अंस वाटतय. त्यामुळेच सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनच वनडे फॉर्मेटच्या पुनरागमन झालय. हे दोघेही श्रेयस अय्यरप्रमाणे स्पिन गोलंदाजी चांगली खेळतात. वर्ल्ड कपचे बहुतांश सामने स्पिन फ्रेंडली विकेटवर होतील. त्यामुळे हे दोघे सिलेक्टरच्या प्लानचा भाग आहेत. आयपीएल आणि WTC फायनलमध्ये श्रेयस अय्यर खेळला नाही. अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. त्याला अजूनही पाठदुखीचा त्रास होतोय.
BCCI अधिकाऱ्याकडून महत्वाची माहिती
बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्सच्या अधिकाऱ्याच्या हवाल्याने महत्वाची माहिती दिलीय. केएल राहुलची रिकव्हरी चांगली सुरु आहे. तो एकमहिन्यात फिट होईल. सर्जरीनंतर पुनरागमन कठीण असतं. वर्ल्ड कपसाठी तो महत्वाचा खेळाडू आहे. अय्यरची प्रगती धीम्या गतीने सुरु आहे. पण तो वर्ल्ड कपपर्यंत फिट होईल, अशी अपेक्षा आहे. श्रेयस अय्यरच्या बाबतीत हे निश्चितपणे म्हणता येणार नाही. श्रेयस अय्यरला पाठिची दुखापत आहे. तो WTC फायनलमध्ये खेळू शकला नाही. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागली.
मेडीकल टीम धोका पत्करणार नाही
“महीन्याभराच्या ब्रेकने खूप मदत मिळालीय. पण दोघेही मॅच फिट होण्यापासून अजून लांब आहेत. NCA मध्ये पुढच्या महिन्यात राहुल प्रॅक्टिस मॅचमध्ये सहभागी होण्याची शक्यता कमी आहे. बीसीसीआयची मेडीकल टीम वर्ल्ड कप लक्षात घेऊन कुठलाही धोका पत्करणार नाही. राहुलला आशिया कपसाठी फिट करण्याची योजना आहे. वर्ल्ड कपआधी त्याने काही सामन्यात खेळावं अशी आमची इच्छा आहे. आशिया कप एक चांगली संधी आहे. तो 100 टक्के फिट असेल, तर आयर्लंड सीरीजमध्ये त्याचा फिटनेस तपासता येईल. श्रेयस अय्यरला आणखी वेळ देण्याची आवश्यकता आहे” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितलं.