World Cup 2023 | फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडला कस हरवायचं? रोहितला ‘या’ देशाने दिला प्लान

| Updated on: Oct 21, 2023 | 4:56 PM

World Cup 2023 | वर्ल्ड कप 2023 मधील टीम इंडिया मोठा सामना खेळ्णार आहे. कारण टींम इंडियाप्रमाणे हीच टीम चालू वर्ल्ड कपमध्ये प्रत्येक सामना जिंकतेय. कदाचित हा सामनाच वनडे वर्ल्ड कप 2023 मधील फायनलआधीचा रंगीत तालिम ठरु शकतो.

World Cup 2023 | फॉर्ममध्ये असलेल्या न्यूझीलंडला कस हरवायचं? रोहितला या देशाने दिला प्लान
Team india ind vs nz odi world cup 2023
Image Credit source: PTI
Follow us on

नवी दिल्ली : भारतात वनडे वर्ल्ड कप सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाच जबरदस्त प्रदर्शन सुरु आहे. टीम इंडिया आतापर्यंत चार सामने खेळली असून चारही सामन्यात विजय मिळवलाय. टीम इंडियाचा आता पुढचा सामना आयसीसी स्पर्धेत सतत त्रास देणाऱ्या टीमसोबत आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडिया आपला पुढचा सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. याच टीमने आतापर्यंत बऱ्याचदा आयसीसी टुर्नामेंटमध्ये भारताचा मार्ग रोखलाय. या वनडे वर्ल्ड कपमधील न्यूझीलंड विरुद्धचा सामना टीम इंडियासाठी सर्वात मोठ आव्हान असेल. पण टीम इंडियाला न्यूझीलंडला कसं जाळ्यात अडकवायच त्याचा मंत्र एका टीमकडून मिळाला आहे.

भारताने वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडवर शेवटचा विजय 2003 मध्ये मिळवला होता. त्यानंतर भारत कधीही वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड विरुद्ध जिंकू शकलेला नाही. 2019 च्या वनडे वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडने सेमीफायनलमध्ये टीम इंडियाला पराभूत केलं होतं. भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 च्या फायनलमध्ये न्यूझीलंडकडूनच हरला होता. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ टीम इंडियासाठी सर्वात मोठे डोकेदुखी आहे.

न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलच जखडून ठेवलं

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये 18 ऑक्टोबरला चेन्नईमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये न्यूझीलंडने 149 धावांनी विजय मिळवला. पण या मॅचमध्ये अफगाणिस्तानच्या स्पिन बॉलर्सनी न्यूझीलंडच्या फलंदाजांना चांगलच जखडून ठेवलं होतं. न्यूझीलंडच्या टीमने 288 धावा केल्या होत्या. मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी आणि राशिद खानची गोलंदाजी खेळताना न्यूझीलंडचे फलंदाज सहज वाटले नाहीत. या तिघांनी टाकलेल्या 28 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीमने 141 धावा केल्या. दोन विकेट गमावल्या.

टीम इंडियाचे हे दोन प्लेयर न्यूझीलंडवर पडणार भारी

भारताकडे चांगले स्पिनर आहेत. चायनामन गोलंदाजी करणारा कुलदीप यादव चांगल्या फॉर्ममध्ये आहे. रवींद्र जाडेजा सुद्धा चांगल्या फॉर्ममध्ये दिसतोय. हे दोघे न्यूझीलंडची स्पिन गोलंदाजी खेळण्याची जी कमतरता आहे, त्याचा फायदा उचलू शकतात. हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या धरमशाळा येथील स्टेडियमवर ही मॅच होत आहे. ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना अनुकूल मानली जाते. पण कुलदीप आणि जाडेजाजी जोडी घातक ठरु शकते. दोघे डावखुरे फिरकी गोलंदाज आहेत. जाडेजाकडे अनुभव आहे. या विकेटवर कशी गोलंदाजी करायची? हे त्याला ठाऊक आहे.