IND vs AUS | मोक्याच्या क्षणी अक्षर चुकला, पण रिंकूने ऑस्ट्रेलियाच्या तोंडून हिरावला विजयाचा घास, VIDEO

| Updated on: Nov 24, 2023 | 8:28 AM

IND vs AUS 1st T20 | टीम इंडियाने पाच सामन्यांच्या T20 सीरीजमध्ये पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 2 विकेटने हरवलं. या मॅचमध्ये कॅप्टन सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि अखेरीस रिंकू सिंहची बॅट तळपली. रिंकूची इनिंग पाहून ऑस्ट्रेलियन्स सुद्धा हैराण झाले असतील.

IND vs AUS | मोक्याच्या क्षणी अक्षर चुकला, पण रिंकूने ऑस्ट्रेलियाच्या तोंडून हिरावला विजयाचा घास, VIDEO
IND vs AUS 1st T20 Rinku singh
Image Credit source: BCCI
Follow us on

IND vs AUS 1st T20 | World Cup 2023 च्या फायनलनंतर चार दिवसांच्या आतच भारत-ऑस्ट्रेलियामध्ये T20 सीरीज सुरु झालीय. एक्सपर्ट्स आणि ऑस्ट्रेलियाई क्रिकेटर मार्नस लाबुशेनला हे पटलेलं नाहीय. पण फॅन्सना या बद्दल कुठीलीही तक्रार नाहीय. फक्त फॅन्सच नाही, युवा क्रिकेटरही या सीरीजमुळे खुश आहेत. सीनियर खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्यांना खेळण्याची संधी मिळतेय. युवा खेळाडू रिंकू सिंहने मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला. IPL मध्ये रिंकूचा जो लौकीक आहे, त्यानुसारच तो खेळला. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्या T20 मध्ये त्याने शानदार फिनिशिंग करुन दाखवलं.

विशाखापट्टनममध्ये पहिला T20 सामना खेळताना टीम इंडियाने ऑस्ट्रेलियावर खूपच रोमांचक विजय मिळवला. अगदी शेवटच्या चेंडूवर 2 विकेटने टीम इंडियाने ही मॅच जिंकली. या मॅचमध्ये एकूण 417 धावांचा पाऊस पडला. जॉश इंग्लिसने धुवाधार शतक झळकावलं. भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने 80 धावा कुटल्या. त्याने आक्रमक फलंदाजी केली. इशान किशनने वेगवान 58 धावा केल्या. अखेरीस रिंकू सिंहने 22 धावांची आक्रमक खेळी करुन सर्वांच मन जिंकलं.

महत्त्वाच्या क्षणी अक्षर पटेल चुकला

18 व्या ओव्हरमध्ये टीम इंडियाला झटका बसला. सेट झालेला सूर्यकुमार यादव 80 रन्सवर आऊट झाला. त्यावेळी टीम इंडियाला 14 बॉलमध्ये 15 रन्सची आवश्यकता होती. रिंकू 7 चेंडूत 12 धावांवर खेळत होता. अक्षर पटेलने 19 व्या ओव्हरचे 3 बॉल निर्धाव खेळून काढले. चौथ्या चेंडूवर त्याने 1 धावा घेतली. त्यावेळी टीम इंडियाला विजयासाठी 8 चेंडूत 12 रन्स हवे होते. रिंकूने त्या ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूंवर चौकार आणि 1 धावा काढली. 6 चेंडूत विजयासाठी 7 रन्स हवे होते.

तिसऱ्या चेंडूपासून पुन्हा ड्रामा

20 व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रिंकूने चौकार मारला. त्यावेळी विजय पक्का वाटू लागला. तिसऱ्या चेंडूपासून पुन्हा ड्रामा सुरु झाला. आधी अक्षर पटेल आणि नंतर रवी बिश्नोई आऊट झाले. 2 चेंडूत 2 धावा हव्या होत्या. बिश्नोई रनआऊट झाला. पण रिंकू स्ट्राइकवर होता. पाचव्या चेंडूवर रिंकू 2 रन्ससाठी पळाला. पण 1 च धावा पूर्ण झाली. कारण दुसरी धावा घेताना अर्शदीप आऊट झाला.


हे रिंकूने दाखवून दिलं

शेवटच्या चेंडूवर 1 रन्स हवा होता. रिंकूने एबटच्या बॉलवर सिक्स मारुन टीमला विजय मिळवून दिला. रिंकूच्या खात्यात 6 रन्स जमा झाले नाहीत, कारण एबटने नो बॉल टाकलेला. भारत जिंकला. रिंकूला भले त्या 6 धावा मिळाल्या नसतील, पण 14 चेंडूत 22 धावा करुन एकाबाजूला विकेट पडत असताना रिंकूने मॅच फिनिश केली. फक्त आयपीएलच नाही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा फिनिशरचा रोल निभावू शकतो हे रिंकूने दाखवून दिलं.