Sri Lanka Tour : भारतीय संघाचा सराव जोमात सुरु, आपआपसांत सामना खेळून रणनीती मजबूत करण्याचे काम सुरु, पाहा फोटो

| Updated on: Jul 08, 2021 | 11:04 AM

भारत आणि श्रीलंका यांच्यातील मर्यादीत षटकांचे सामने सुरु होण्यास काही दिवस राहिले आहेत. तत्पूर्वी आपला खेळ मजबूत करण्यासाठी आणि श्रीलंकेतील मैदानाची स्थिती जाणून घेण्यासाठी भारतीय संघ आपआपसांत सराव सामने खेळत आहेत.

1 / 5
एकीकडे भारताचा वरिष्ठ संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असून युवा खेळाडूंची फौज श्रीलंका दौऱ्यावर गेली आहे. या दौऱ्यात चेतन सकारिया, देवदत्त पडिक्कल, अर्शदीप सिंग अशा अनेक नवख्या खेळाडूंना प्रथमच संघात संधी देण्यात आली आहे. तर इशान किशन, सूर्यकुमारसारखे खेळाडूदेखील आपली दुसरीच आंतरराष्ट्रीय मालिका खेळत आहेत.

2 / 5
या दौऱ्यात तीन वनडे आणि तीन ट्वेन्टी-20 सामने खेळणार आहे. हे सर्व सामने कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहेत. यात पहिला एकदिवसीय सामना 13 जुलै, दुसरा 16 जुलै आणि तिसरा 18 जुलैला खेळवला जाणार आहे. तर पहिला टी-20 सामना 21 जुलै, दुसरा 23 जुलै आणि तिसरा 25 जुलैला खेळवला जाईल. दरम्यान सामन्यांआधी सराव म्हणून भारतीय खेळाडू आपआपसांत मिळून सराव सामना खेळत आहेत. या सामन्याचे काही फोटो बीसीसीआयने त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहेत. वरील फोटोत कर्णधार शिखर धवन (Shikhar Dhawan) झेल घेताना दिसत असून नॉन स्ट्राईकवर सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) दिसत आहे.

3 / 5
इतराच्या तुलनेत वरिष्ठ असणारा फलंदाज मनिष पांडे (Manish Pandey) वरील फोटोत सराव सामन्यात फलंदाजी करताना दिसत आहे, पांडे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत असला तरी अजूनपर्यंत हवी तशी कामगिरी त्याला करता आलेली नाही. त्यामुळे या दौऱ्यात तरी तो स्वत:ला सिद्ध करतो का? हे पाहावे लागेल.

4 / 5
खराब फॉर्ममुळे मागील परदेशी दौऱ्यातून संघाबाहेर करण्यात आलेल्या पृथ्वी शॉने (Pruthvi Shaw) स्थानिक क्रिकेट स्पर्धांसह आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केली. त्यामुळे तो श्रीलंका दौऱ्यातही तशीच कामगिरी करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

5 / 5
आयपीएलमध्ये धोनीच्या चेन्नई सुपरकिंग संघाकडून अप्रतिम कामगिरी केल्यामुळे संघात स्थान मिळालेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) वरील फोटोत फलंदाजी करताना एक उत्कृष्ठ कवर ड्राईव्ह मारताना दिसत आहे.