India ODI Squad for South Africa : भारतीय संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकला आहे. यानंतर दोन्ही संघांमध्ये एकदिवसीय मालिकाही खेळवली जाणार आहे, ज्यासाठी भारतीय संघाची निवड पहिल्या कसोटीनंतरच होणार होती, परंतु ती पुढे ढकलण्यात आली आहे. कारण, कर्णधार रोहित शर्मा अद्याप फायनल फिटनेस टेस्ट पास झालेला नाही. त्यामुळेच सिलेक्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. (Team selection in next 24 hours for ODI series against South Africa, Rohit Sharma has to clear fitness test)
इनसाइडस्पोर्टने बीसीसीआयच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड येत्या 24 तासांत होऊ शकते. निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा सध्या रोहित शर्मा फिटनेस टेस्ट पास होण्याची वाट पाहात आहेत. रोहितने पहिली टेस्ट पास केली आहे, परंतु आता त्याला अंतिम फिटनेस टेस्ट पास करायची आहे.
सूत्रांनी सांगितले की, रोहित शर्मा रिकव्हरीच्या अगदी जवळ आहे, पण आम्हाला घाई करायची नाही. तो खूप खास खेळाडू आहे. त्याने राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) मधील प्राथमिक चाचणी पास केली आहे, परंतु आता आम्ही रोहित 100% फिट होण्याची वाट पाहात आहोत. येत्या 24 तासांत याबाबत निर्णय घेतला जाईल.
गरज पडल्यास कठोर पावले उचलावी लागतील, असे चेतन शर्मा म्हणाले. सध्या आम्ही रोहितच्या फिटनेसला प्राधान्य देत आहोत. पण केएल राहुलही संघात असेल. विराट कोहलीही उपस्थित राहणार आहे. त्यामुळे रोहित दौऱ्यावर जाऊ शकला नाही तरी संघाला कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही.
भारतीय संघाने नुकतेच दक्षिण आफ्रिकेचा त्यांच्या घरच्या मैदानावर झालेल्या सेंच्युरियन कसोटीत 113 धावांनी पराभव केला होता. तसेच 3 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. या मालिकेतील शेवटची कसोटी 11 जानेवारीपासून खेळवली जाणार आहे. यानंतर 19 जानेवारीपासून भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 3 वनडे सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे.
इतर बातम्या
IND vs SA: VIDEO: जिंकल्यानंतर टीम इंडियासोबत आफ्रिकन्सही हॉटेलमध्ये जोरदार नाचले
IND VS SA: नेटमध्ये ते आम्हाला सहकारी समजत नाहीत, सामन्यानंतर केएल राहुलचं वक्तव्य
(Team selection in next 24 hours for ODI series against South Africa, Rohit Sharma has to clear fitness test)