Mohammed Siraj IPL 2023 : सिराजच्या ‘त्या’ फोटोने सगळेच हळहळले, त्याला सर्वात जास्त दु:ख झालं, कारण….

| Updated on: May 22, 2023 | 2:15 PM

Mohammed Siraj IPL 2023 : पराभवानंतर मोहम्मद सिराजचे डोळे पाणावले. मोहम्मद सिराजला सर्वात जास्त दु:ख होणं स्वाभाविक आहे. त्यामागे कारण सुद्धा तसच आहे. काल निकाल लागल्यानंतर सिराजचा मैदानातच झोपला, तो फोटो पाहून RCB चे फॅन्सही गहिवरले.

Mohammed Siraj IPL 2023 : सिराजच्या त्या फोटोने सगळेच हळहळले, त्याला सर्वात जास्त दु:ख झालं, कारण....
Mohammed siraj ipl 2023
Image Credit source: jio cinema
Follow us on

बंगळुरु : रॉयल चॅलेंजर्स बँगलोर टीमच इंडियन प्रीमियर लीगची ट्रॉफी जिंकण्याच स्वप्न पुन्हा एकदा अपूर्ण राहिलं. IPL 2023 टुर्नामेंटमध्ये काल त्यांचं आव्हान संपुष्टात आलं. गुजरात टायटन्सने RCB चा 6 विकेटने पराभव केला. या पराभवानंतर RCB टीममधील प्लेयर खूप भावूक झाले होते. शतकवीर विराट कोहली आणि मोहम्मद सिराज यांना आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवता आलं नाही.

मुंबई इंडियन्सने सनराजयर्स हैदराबादला 8 विकेटने हरवल्यानंतर रॉयल चॅलेजर्स बँगलोरला गुजरात टायटन्स विरुद्ध विजय मिळवणं क्रमप्राप्त बनलं होतं. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्लेऑफची बर्थ निश्चित करण्यासाठी त्यांना विजय हवाच होता.

शुभमनने विजयाचा घास हिरावला

विराटच्या 61 चेंडूतील नाबाद 101 धावांनी बँगलोरच्या विजयाची आस निर्माण केली. त्याचवेळी शुभमन गिलच्या 52 चेंडूतील नाबाद 104 धावांनी RCB चा विजयाचा घास हिरावला. आरसीबीने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 197 धावा केल्या. शुभमन गिलच्या शतकाच्या बळावर गुजरातने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरवर आरामात विजय मिळवला.

विराट एकटा लढला

शुभमन गिलच्या बॅटमधून शतकी सिक्स निघाल्यानंतर डग आऊटमध्ये बसलेला विराट कोहली निराश झाला. विराटने या मॅचमध्ये खूप प्रयत्न केले. त्याने शतक साकारल. पण ते वाया गेलं. काल विराट आरसीबीकडून एकाकी लढला. ही झुंज व्यर्थ गेली.

विराट-सिराज जबरदस्त खेळले

पराभवाच दु:ख इतकं होतं की, मोहम्मद सिराज मैदानातच झोपला. दु:ख, निराशा, हताशा आरसीबीच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. आयपीएल 2023 च्या सीजनमध्ये विराट कोहली आणि मोहम्मद सिराज दोघांनी जबरदस्त कामगिरी केली. विराटने 139.82 च्या सरासरीने 639 धावा केल्या. तेच मोहम्मद सिराजने 19.78 च्या सरासरीने 19 विकेट घेतले.