अमेरिकेत पहिल्यांदा T20 वर्ल्ड कप आयोजित करण्यात आलाय. या वर्ल्ड कपबद्दल प्रचंज उत्साह आणि उत्सुक्ता आहे. पहिल्यांदा अमेरिकेत क्रिकेटला इतक महत्त्व मिळतय. खासकरुन भारत-पाकिस्तान सामन्यामुळे उत्साह शिगेला पोहोचलाय. वर्ल्ड कप फायनल इतकच या मॅचच महत्त्व आहे. भारत-पाकिस्तान सामना म्हटला की, प्रसिद्धी आपोआपच मिळते. काही अशा शक्ती सुद्घा आहेत, ज्यांना खेळ बिघडवायचा आहे. न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या या मॅचवर ISIS-K (खोरासान) या दहशतवादी संघटनेची नापाक नजर आहे. हल्ल्याची शक्यता लक्षात घेऊन न्यू यॉर्क पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्तात वाढ केलीय.
T20 वर्ल्ड कप 2024 सामन्यांच अमेरिकेत 3 वेन्यूवर आयोजन होणार आहे. न्यू यॉर्कमध्ये पहिल्यांदा क्रिकेट सामना आयोजित होतोय. त्यासाठी न्यू यॉर्कच्या नासो काऊंटीमध्ये आइजनहावर पार्कमध्ये तात्पुरत स्टेडियम बनवण्यात आलय. जवळपास 30 हजार प्रेक्षक क्षमता असलेल्या या स्टेडिमयमध्ये टीम इंडिया प्रॅक्टिस मॅचसह 4 सामने खेळणार आहे. यात भारत-पाकिस्तान मॅच आहे. या मॅचला स्टेडियम खच्चून भरलेल असेल.
कोणी दिली धमकी?
भारत-पाकिस्तान सामन्यासाठी ISIS-K ने धमकी दिली आहे. त्यांनी धमकीचा व्हिडिओ जारी केलाय. त्यांनी आपल्या हल्लेखोरांना भारत-पाकिस्तान सामना सुरु असताना ‘लोन वूल्फ’ अटॅक करण्याचा आदेश दिला आहे. त्यानंतर नासो काऊंटी प्रशासन अधिक सर्तक झालय. अशा इवेंटसाठी इतक मोठं क्राऊड असताना अशा धोक्याला गांभीर्याने घेतलं पाहिजे असं नासो काऊंटीचे पोलीस आयुक्त पॅट्रिक रायडर म्हणाले. कमिश्नरने सांगितलं की, “सुरुवातीला ही धमकी जगभरातील वेगवेगळ्या इवेंट्ससाठी होती. पण आता त्यांच लक्ष्य भारत-पाकिस्तान सामन्यावर केंद्रीत झालय”
व्हिडिओमध्ये काय दिसतय?
जो व्हिडिओ रिलीज करण्यात आलाय, त्यामध्ये स्टेडियमच्या वर एक ड्रोन उडताना दाखवल असून त्यावर 9/06/2024 तारीख आहे. याच दिवशी भारत-पाकिस्तान सामना आहे. ड्रोन हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन नासो काऊंटीने अमेरिकी एविएशन एडमिनिस्ट्रेशनला मॅच वेन्यू, आइजनहावर पार्क आणि आसपासच्या भागाल ‘नो-फ्लाय झोन’ घोषित करण्यासाठी निवेदन दिलय. न्यू यॉर्कच्या गव्हर्नरने सांगितलं की, वर्ल्ड कपला कुठलाही गंभीर धोका नाहीय. त्यांनी पोलीस खात्याला सुरक्षा बंदोबस्त अजून मजबूत करायला सांगितला आहे.