आयपीएल 2024 : शनिवारी आयपीएल 2024 चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. केकेआरने हा सामना जिंकला. कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबाद 19व्या ओव्हरमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कला एका ओव्हरमध्ये चार सिक्स मारले आणि सामना पूर्णतः उलटला.
मिचेल स्टार्क सनरायझर्स हैदराबादकडून 19 वी ओव्हर टाकायला आला होता. हैदराबादला विजयासाठी 39 धावांची गरज होती. स्टार्क अप्रतिम बॉलिंग करुन सामना जिंकेल असं वाटत होतं. पण SRH चा पॉवर हिटर हेनरिक क्लासेनने स्टार्कच्या ओव्हरची सुरुवात सिक्सने केली. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. तिसरा चेंडू वाईड राहिला.
दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने (क्लासेन) सलग दोन चेंडूंवर 2 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर क्लासेनने सिंगल घेतली आणि आता शाहबाज अहमद स्ट्राईकवर होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानेही सिक्स मारला. अशाप्रकारे हैदराबादने स्टार्कच्या एका षटकात २६ धावा केल्या.
मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन विकत घेतला.
हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 208 धावा केल्या. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. केवळ 4 धावांनी त्यांचा पराभव झाला.