बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय

| Updated on: Aug 06, 2024 | 12:30 AM

बांगलादेशमधील परिस्थिती नाजूक आहे. आंदोलनात ३०० हून अधिक लोकं मारली गेली आहे. पंतप्रधानांना पद सोडावे लागले आहेत. इतकंच नाही तर देश देखील सोडावा लागला आहे. आता याचा क्रिकेला ही मोठा फटका बसणार आहे. आयसीसी यावर बारीक नजर ठेवून आहे.

बांगलादेशमधील आंदोलनाचा क्रिकेटलाही फटका, ICC घेणार मोठा निर्णय
Follow us on

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर त्यांना देशही सोडावा लागला आहे. आता लष्कराने बांगलादेशची सत्ता काबीज केली आहे. या राजकीय घडामोडीचा परिणाम क्रिकेटवर देखील होणार आहे. त्यामुळे बांगलादेशकडून महिला टी-२० विश्वचषकाचे यजमानपद हिरावून घेतले जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयसीसी बांगलादेशातील परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे. आयसीसी महिला T20 विश्वचषक ऑक्टोबर महिन्यात बांगलादेशमध्ये आयोजित करण्याचा प्रस्ताव आहे, परंतु राजकीय परिस्थितीमुळे या स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. या स्थितीत बांगलादेशच्या भूमीवर टी-20 विश्वचषक आयोजित करणे शक्य नसल्याचे मानले जात आहे. अशा परिस्थितीत महिला टी-20 विश्वचषक श्रीलंका किंवा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केला जाऊ शकतो. मात्र, अद्याप याबाबत अधिकृत वक्तव्य आलेले नाही. पण ICC लवकरच मोठा निर्णय घेऊ शकते असे मानले जात आहे.

बांगलादेशच्या इतिहासात लष्कराने सत्ता काबीज करण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी 1975 मध्येही लष्कराने तेथील सत्ता काबीज केली होती. त्यावेळी देशात शेख मुजीबुर रहमान यांचे सरकार होते. शेख मुजीबुर रहमान हे शेख हसीनाचे वडील होते. त्या काळात जेव्हा लष्कराने देशाची सत्ता काबीज केली होती, तेव्हा लष्कराने बांगलादेशवर सुमारे 15 वर्षे राज्य केले.

शेख हसीना यांचे विमान गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवर थांबले आहे. दरम्यान, आज भारतातील पंतप्रधानांच्या निवासस्थानी सुमारे दीड तास सीसीएसची बैठक झाली. जिथे परराष्ट्र मंत्री आणि NSA यांनी बांगलादेशातील प्रत्येक परिस्थितीची माहिती पंतप्रधानांना दिली आहे. आता शेख हसीनाचे विमान हिंडन एअरबेसवरून कुठे जाणार हे स्पष्ट झालेले नाही.

शेख हसीना यांच्या जाण्याने दक्षिण आशियामध्ये मोठे बदल पाहायला मिळू शकतात, विशेषत: चीनचा वाढता प्रभाव आणखी मजबूत होऊ शकतो, जे भारतासाठी मोठे आव्हान आहे. उदाहरणार्थ, चीन तिस्ता सिंचन प्रकल्पावर डोळा ठेवून होता, पण भारताने त्यात सहकार्याचा प्रस्ताव दिल्याने शेख हसीना यांनी आपली धोरणे बदलली.

प्रकल्पाचे स्थान सिलीगुडी कॉरिडॉरच्या जवळ आहे, जे भारतासाठी धोरणात्मक डोकेदुखी आहे. हा कॉरिडॉर चिकन्स नेक म्हणून ओळखला जातो, जो ईशान्येला रस्त्याने जोडण्याचा एकमेव मार्ग आहे.