नवी दिल्ली: केपटाऊन कसोटीत (Capetown test) काल डीआरएसच्या निर्णयावरुन (DRS Decision) विराट कोहली (Virat Kohli) स्वत:ला व्यक्त करण्यापासून रोखू शकला नाही. विराट कोहलीची व्यक्त होण्याची ही पद्धत सर्वसामान्य क्रिकेट चाहत्यांप्रमाणे अनेक माजी क्रिकेटपटूंनाही पटलेली नाही. डीआरएस पद्धतीवर आगपाखड करताना विराटने मर्यादा ओलांडली असे या माजी क्रिकेटपटूंचे मत आहे. विराटने स्टंम्प जवळ जाऊन आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. त्या स्टंम्पसमध्ये मायक्रोफोन आहेत. सध्या कोरोनामुळे प्रेक्षकांना स्टेडियममध्ये परवानगी नाहीय. त्यामुळे जे काही मैदानावर घडतं, ते सर्वांना ऐकू जातं.
मैदानात नेमकं काय घडलं?
तिसऱ्यादिवसाच्या अखेरच्या सत्रात डीन एल्गर आणि कीगन पीटरसनची जोडली जमली होती. ते संघाला विजयी लक्ष्याच्या दिशेने नेत होते. त्याचवेळी अश्विनच्या एका चेंडूवर एल्गरला फसला. भारतीय संघाने पायचीतचे अपील करताच मैदानावरील पंच माराईस इरास्मस यांनी एल्गरला आऊट दिले.
एल्गरने रिव्ह्युचा निर्णय घेतला. पण मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला जाईल, असे त्याला वाटत नव्हते. रिप्ले पाहिल्यानंतर एल्गर ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला होता. बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीने चेंडू स्टंम्पसवरुन जातोय, असं दाखवलं.
आर. अश्विन, विराट कोहली आणि केएल राहुलला बॉल ट्रॅकिंग टेक्नोलॉजीवर विश्वास बसला नाही. तिसऱ्या पंचांनी एल्गरला नाबाद ठरवलं. त्यानंतर या तिघांनी स्टंम्पजवळ जाऊन आपला संताप व्यक्त केला. जेणेकरुन सर्वांना समजेल. खरंतर हे टाळता आलं असतं.
विराट कोहली काय म्हणाला?
विराट कोहली स्टंम्पसजवळ जाऊन म्हणाला. “फक्त विरोधी टीमवरच नाही, तर तुमच्या संघावरही लक्ष द्या. नेहमी लोकांना पकडण्याचा प्रयत्न करत असता”
आकाश चोप्रा म्हणतो….
“मैदानावर त्यावेळी जे वातावरण होतं, मनासारखं घडत नव्हतं. त्यामुळे विराट तशा पद्धतीने व्यक्त झाला. त्या क्षणाला घडलेली ती गोष्ट होती. पण भारतीय कर्णधाराने सावध असलं पाहिजे. असं वागणं योग्य नव्हे”
Dean Elgar survives ?
Initially given out, he reviewed it, and the decision was overturned. Big moment in the match and the series?
? Stream #SAvIND live: https://t.co/0BMWdennut pic.twitter.com/6EJmtd0Qy3
— SuperSport ? (@SuperSportTV) January 13, 2022
“विराट कोहलीचं मैदानावरील असं वर्तन योग्य नव्हे. सामना पाहणारी जी मुलं आहेत, त्यांच्या मनात अंपायर आणि टेक्नोलॉजीबद्दल एक ठराविक असा दृष्टीकोन तयार होऊ शकतो” असं चोप्रा म्हणाले. भारताने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले असून विजयासाठी त्यांना आता 111 धावांची आवश्यकता आहे. त्यांचे अजून आठ विकेट शिल्लक आहेत.