मुंबई: श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवामुळे टीम इंडियाचा आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याचा मार्ग बिकट बनलाय. श्रीलंकेकडून झालेल्या पराभवामुळे भारतीय चाहतेही निराश आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये आशिया कपची फायनल व्हावी, अशी चाहत्यांची इच्छा होती. पण आता असं होण्याची शक्यता कमी आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यानंतर रोहित शर्माचा खास अंदाज चाहत्यांना आवडला. प्रेस कॉन्फरन्स दरम्यान एका पत्रकाराने रोहित शर्माला प्रश्न विचारला. रोहित भाई चाहत्यांना भारत-पाकिस्तानमध्ये फायनल पहायची होती. आम्हाला भारत-पाक फायनल पहायला मिळेल का? त्यावर हिटमॅनने गमतीशीर उत्तर दिलं.
‘भाई तू टेंशन नको घेऊ. भारत-पाकिस्तानमध्येच फायनल होईल’ रोहितने एवढ बोलताच तिथे उपस्थित पत्रकारांनी टाळ्यांचा कडकडाट केला. रोहितला सुद्धा आपलं हसू आवरता आलं नाही.
ROHIT SHARMA:- India vs Pakistan final hoga तू tention मत ले ???#INDvsPAK2022 #INDvSL #AsiaCupT20 #RohitSharma? #ViratKohli? #BCCI #RohitSharma pic.twitter.com/2pJbIgsjiJ
— Chotu (@Harshit47703219) September 7, 2022
श्रीलंकेविरुद्ध टीम इंडियाने पहिली फलंदाजी केली. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 173 धावा केल्या. कॅप्टन रोहितने तुफानी बॅटिंग केली. त्याने 41 चेंडूत 72 धावा चोपल्या. त्याच्याच फलंदाजीच्या बळावर भारताने 8 विकेट गमावून 174 धावांच लक्ष्य दिलं. टीम इंडियाचा या मॅचमध्ये 6 विकेटने पराभव झाला.
आज अफगाणिस्तान-पाकिस्तानमध्ये सामना होणार आहे. त्या मॅचमध्ये कोण जिंकतं? त्यावर टीम इंडियाचा पुढचा प्रवास अवलंबून असेल. पाकिस्तानची टीम जिंकली, तर टीम इंडियाचा प्रवास संपेल. उद्या अफगाणिस्तानविरुद्धचा सामना औपचारिकता मात्र असेल. पण अफगाणिस्तानची टीम जिंकली, तर भारताच्या आशा जिवंत राहतील.