महेंद्रसिंग धोनीची सासू सांभाळते त्याची ही कंपनी, इतक्या कोटींची आहे संपत्ती

| Updated on: Apr 19, 2024 | 9:53 PM

क्रिकेटच्या मैदानावर एक चांगला खेळाडू असण्यासोबतच महेंद्रसिंग धोनी एक चांगला बिझनेसमन देखील आहे. धोनीने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रात गुंतवणुूक केली आहे. धोनीची एक कंपनी अशी देखील आहे जी त्याची सासू आणि पत्नी सांभाळते. चार वर्षात कंपनीने मोठे यश मिळवले आहे.

महेंद्रसिंग धोनीची सासू सांभाळते त्याची ही कंपनी, इतक्या कोटींची आहे संपत्ती
dhoni
Follow us on

मुंबई : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी रांची सारख्या छोट्या शहरातून आला आणि भारतीय क्रिकेटवर राज्य केलं. महेंद्रसिंग धोनी निवृत्तीनंतर वेगवेगळ्या व्यवसायात गुंतला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीने विविध व्यवसायांमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. त्यापैकी एक म्हणजे धोनी एंटरटेनमेंट लिमिटेड. मात्र, धोनी स्वतः ही कंपनी थेट चालवत नाही. ही कंपनी धोनीची सासू सांभाळते. धोनीची पत्नी साक्षीची आई शीला सिंह हे धोनीची ही मनोरंजन कंपनी चालवत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धोनीची सासू आणि त्याची पत्नी साक्षी दोघेही 2020 पासून ही कंपनी संयुक्तपणे सांभाळत आहेत. याबाबत अधिकृत माहिती नसली तरी कंपनीशी संबंधित महत्त्वाचे निर्णय धोनीची सासूच घेते असे बोलले जात आहे.

800 कोटींहून अधिक संपत्ती

शीला सिंह आणि साक्षी धोनी यांच्या देखरेखीखाली धोनीची एन्टरटेन्मेंट कंपनी खूप प्रगती करत आहे आणि नवीन प्रोजेक्ट्स सुरू करत आहे. उल्लेखनीय आहे की शीला सिंह पहिल्यांदाच एखाद्या कंपनीच्या सीईओ बनल्या आहेत. शीला सिंग आणि साक्षी यांच्या नेतृत्वाखाली धोनी एंटरटेनमेंट लिमिटेडची निव्वळ संपत्तीही गगनाला भिडत आहे.

अवघ्या चार वर्षांत त्याची किंमत 800 कोटींहून अधिक झाली आहे. सध्या या प्रॉडक्शन कंपनीमध्ये साक्षी धोनीची बहुतांश मालकी आहे. धोनीने अनेक प्रकारच्या व्यवसायात हात आजमावला असून त्यामुळे त्याची संपत्ती 1000 कोटींहून अधिक झाली आहे.

साक्षी धोनीची बिझनेस पार्टनर

धोनीशी लग्न करण्यापूर्वी साक्षी हॉटेल इंडस्ट्रीत काम करत होती. धोनी 2007 मध्ये कोलकाता येथील एका हॉटेलमध्ये तिला भेटला होता. साक्षीला हॉटेल इंडस्ट्रीचा खूप अनुभव आहे. याशिवाय साक्षी चेन्नईमध्ये असलेल्या रांची रेज हॉकी क्लबची सह-मालक आहे. ती Instagram आणि Twitter वर देखील खूप सक्रिय असते. तिच्या कौटुंबिक जीवनाबद्दल आणि रांची रेज हॉकी क्लबबद्दल माहिती तिच्या 4.8 दशलक्ष फॉलोअर्ससह शेअर करत असते.