PHOTO : ‘या’ भारतीयांनी देशाकडून संधी न मिळाल्याने घेतली निवृत्ती, आता विदेशी संघातून खेळणार क्रिकेट, विश्वचषक विजेत्या कर्णधाराचाही समावेश

| Updated on: Aug 23, 2021 | 1:48 PM

भारताकडून काही असे खेळाडू आहेत जे अमेरिका आणि इतर देशांतील लीगमध्ये खेळण्याकरता भारतीय क्रिकेटमधून निवृत्त झाले आहेत. यामधील एकानेतर भारताला विश्वचषकही मिळवून दिला आहे.

1 / 5
भारतीय स्थानिक क्रिकेटमधून आंतरराष्ट्रीय दर्जावर खेळता यावं यासाठी काही भारतीय क्रिकेटपटू भारतीय क्रिकेटला अलविदा करुन परदेशातील लीगमध्ये सहभाग घेत आहेत. यामध्ये नुकताच समाविष्ट झालेलं नाव म्हणजे मुंबईच्या हरमीत सिंग याचं. हरमीतने अमेरिकेच्या मेजर क्रिकेट लीगमधील सीएटल थंडरबोल्ट संघासोबत करार केला. त्यासाठी त्याने भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.

2 / 5
हरमीत आधी काही दिवस भारताला अंडर 19 वर्ल्डकप जिंकवून देणारा कर्णधार उन्मुक्त सिंग (unmukt singh) यानेदेखील अमेरिका येथे  आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळता यावे यासाठी भारतीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. त्याने ट्विटरवरुन याबाबत माहिती देताना दुखही व्यक्त केलं होतं.

3 / 5
दिल्ली रणजी संघाकडून खेळलेला अष्टपैलू खेळाडू मनन शर्मानेही अवघ्या 30 वर्षाच्या वयात भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. परदेशात चांगली संधी मिळवण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं आहे.  अमेरिकेत कॅलिफोर्नियाला जाण्याचं पाऊल उचलणारा मननही 2010 साली विश्वचषक खेळलेल्या अंडर 19  संघाचा खेळाडू होता. आयपीएलमध्येही तो कोलकाता नाइट रायडर्स संघाकडून खेळला आहे.

4 / 5
भारताकडून अंडर 19 विश्वचषक विजेत्या संघातील खेळाडू स्मित पटेलनेही काही महिन्यांआधी भारतीय क्रिकेटमधून संन्यास घेतला. स्मितला बारबाडोस ट्राइडेंट्सने कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये (सीपीएल) खेळण्याची संधी दिल्याने त्याने हा निर्णय घेतला होता.

5 / 5
भारतीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन अमेरिकेला जाणाऱ्या खेळाडूंमध्ये दिल्लीचा माजी फलंदाज मिलिंद कुमारचं नावही आहे. टीम फिलाडेल्फियंस साठी 30 वर्षीय मिलिंद खेळणार आहे.