IND vs SL : श्रीलंका दौऱ्यात ‘या’ खेळाडूंकडून टीम इंडियाला सर्वाधिक धोका, वन-डे, टी-20 मध्ये दमदार रेकॉर्ड
भारत आणि श्रीलंका दौऱ्यातील पहिला एकदिवसीय सामना आजपासून सुरु होणार होता. पण कोरोनाच्या संकटामुळे सामने पुढे ढकलण्यात आले असून आता 18 जुलैपासून सुरु होणार आहेत. दोन्ही संघ मैदानात उतरुन धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
1 / 5
भारत श्रीलंका दौऱ्यातील सामने 18 जुलैपासून सुरु होणार आहेत. यामध्ये 3 एकदिवसीय सामने आणि 3 टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. पण सामने सुरु होण्यापूर्वी टीम इंडियाला काही श्रीलंकन खेळाडूंच्या खेळाबाबत विचार करुन तशी रणनीती करणे गरजेचे आहे.
2 / 5
या खेळाडूंमध्ये सर्वांत पहिले नाव येते एकदिवसीय सामन्यांत भारताविरुद्ध दमदार बॅटिंग करणाऱ्या आणि श्रीलंकेच्या सध्याच्या संघातील सर्वाधिक धावा करणाऱ्या कुसल परेरा (Kusal Perera) याचे. कुसल परेराने आतापर्यंत भारताविरुद्ध बरेच रन कुटले असून त्याची एकदिवसीय क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी आहे.
3 / 5
भारताविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा सध्याच्या श्रीलंका संघातील खेळाडू आहे अकिला धनंजया. त्याने आतापर्यंत 11 विकेट्स घेत भारताच्या दिग्गजांना तंबूत धाडले आहे.
4 / 5
एकदिवसीयसह टी-20 फॉर्मेटमध्येही भारताविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा श्रीलंकन फलंदाज कुसल परेराच आहे. सध्या खेळणाऱ्या श्रीलंकन संघात भारताविरुद्ध त्याचा रेकॉर्ड सर्वात बेस्ट आहे. त्याने 215 धावा केल्या असल्याने एकदिवसीय आणि टी-20 अशा दोन्ही प्रकारात त्याच्या विकेटवर भारती गोलंदाजाना लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
5 / 5
श्रीलंकाच्या सध्याच्या संघात भारताविरुद्ध टी-20 प्रकारात सर्वाधिक विकेट डी. चामीरा याने घेतले आहेत. त्यामुळे टी-20 सामन्यात त्याच्याविरुद्ध फलंदाजी करताना भारतीय फलंदाजाना सावध खेळावे लागणार आहे.