ख्राइस्टचर्च: न्यूझीलंड टीमचे दोन मोठे खेळाडू सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडले आहेत. ट्रेंट बोल्ट आणि मार्टिन गप्टिल यांनी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाशी आपला करार मोडला आहे. पुढच्या काही दिवसात अजून काही खेळाडू असं पाऊल उचलू शकतात. टिम साऊदीने हे वक्तव्य केलय. भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचआधी टिम साऊदीने हे विधान केलं. टी 20 लीग्स आल्यामुळे क्रिकेटमध्ये हा बदल झाल्याच त्याने सांगितलं.
आता जास्त खेळाडू नॅशनल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडू शकतात. अलीकडेच जिम्मी नीशॅमही वेगवेगळ्या लीग्समध्ये खेळण्यासाठी सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडला.
टिम साऊदी काय म्हणाला?
“मागच्या काही महिन्यात क्रिकेट खूपच बदललय. माझं न्यूझीलंड क्रिकेट बोर्डासोबत कॉन्ट्रॅक्ट आहे. मी आयपीएलमध्ये खेळणार आहे. बघू पुढे काय होतं?” असं टिम साऊदी म्हणाला. मागच्या दोन-तीन वर्षांच्या तुलनेत बरेच बदल झालेत. साऊदी 2023 आयपीएल सीजनमध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळताना दिसेल.
मी जास्त पुढचा विचार करत नाही
टिम साऊदी संघात असताना, तीन मोठे खेळाडू सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमधून बाहेर पडलेत. तो सुद्धा हाच मार्ग अनुसरणार का?. साऊदीने सध्या तरी असं करण्यास नकार दिलाय. साऊदीला तिन्ही फॉर्मेटमध्ये खेळण्याची इच्छा आहे. “मी जास्त पुढचा विचार करत नाही. येणाऱ्या महिन्यांमध्ये मला भरपूर क्रिकेट खेळायचय” असं साऊदी म्हणाला.
साऊदीने गाठला मोठा टप्पा
भारताविरुद्ध पहिल्या वनडेत 3 विकेट घेऊन साऊदी 300 टेस्ट, 200 वनडे आणि टी 20 मध्ये 100 विकेट घेणारा क्रिकेट विश्वातील पहिला गोलंदाज ठरलाय. साऊदी आपल्या या कामगिरीवर खूश आहे.
टीम इंडियासाठी करो या मरो मॅच
भारत आणि न्यूझीलंडमध्ये तिसरा वनडे सामना ख्राइस्टचर्च येथे खेळला जाणार आहे. सीरीजचा शेवटचा सामना टीम इंडियासाठी करो या मरो आहे. भारताने पहिला सामना गमावला. दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला. आता तिसरा सामना गमावला, तर टीम इंडियाच्या हातून मालिका निसटेल.