IND vs USA : जिंकलो, पण टीम इंडियात आता हा महत्त्वाचा बदल करण्याची वेळ आलीय, VIDEO

| Updated on: Jun 13, 2024 | 8:45 AM

IND vs USA : टीम इंडियाने काल अमेरिकेविरुद्ध विजय मिळवला. पण टीम इंडियाच्या विजयात ती शान दिसली नाही. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाला यापुढे बलाढ्य संघांचा सामना करायचा आहे. त्यामुळे टीम इंडियाने काही बदल करण आवश्यक आहे. अन्यथा पुढच्या सामन्यात त्याचा फटका बसेल.

IND vs USA : जिंकलो, पण टीम इंडियात आता हा महत्त्वाचा बदल करण्याची वेळ आलीय, VIDEO
टी20 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं वर्चस्व दिसून आलं आहे. दोन सामन्यात विजय मिळवून भारताने सुपर 8 फेरीच्या दिशेने कूच केली आहे. भारतीय संघ 265 गुणांसह पहिल्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलियाचा संघ 258 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे.गतविजेता इंग्लंड संघ 254 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
Follow us on

टीम इंडियाने T20 वर्ल्ड कपच्या सुपर-8 राऊंडमध्ये प्रवेश केलाय. काल न्यू यॉर्कमध्ये झालेल्या सामन्यात टीम इंडियाने अमेरिकेवर 7 विकेटने विजय मिळवला. पण त्या विजयामध्ये ती शान नव्हती. सूर्यकुमार यादव नाबाद (49) आणि शिवम दुबे नाबाद (31) यांनी चौथ्या विकेटसाठी केलेल्या निर्णायक भागीदारीमुळे टीम इंडियाने हा विजय मिळवला. टीम इंडियाने वर्ल्ड कपमध्ये सलग तीन सामने जिंकले असले, तरी फलंदाजी हा चिंतेचा विषय आहे. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात फलंदाजीतील त्रुटी उघड झाल्या होत्या. आता अमेरिकेविरुद्ध सामन्यातही टॉप ऑर्डरचे अपयश नजरेत येणार आहे. काल अमेरिकेविरुद्ध खेळताना कॅप्टन रोहित शर्मा (3) आणि विराट कोहली (0) ही ओपनिंग जोडी 15 धावात तंबूत परतली. ऋषभ पंत (18) धावांवर आऊट झाला. 44 रन्सवर तीन विकेट गेले होते. त्यानंतर सूर्या आणि शिवम दुबेने सामन्याची सूत्र हाती घेत विजय मिळवून दिला.

न्यू यॉर्कमधील खेळपट्टी गोलंदाजांना पोषक मानली जातेय. पाटा विकेट नसल्यामुळे मोठी धावसंख्या होत नाहीय. भारतीय गोलंदाज आपली भूमिका चोख बजावतायत. पण भारतीय टॉप ऑर्डरच अपयश सलणार आहे. खासकरुन विराट कोहली ओपनर म्हणून तिन्ही सामन्यात अपयशी ठरलाय. आयपीएलमध्ये हाच विराट कोहली RCB साठी रनमशीन ठरला होता. ओपनर म्हणून त्याने खोऱ्याने धावा केल्या होत्या. त्याचा हाच फॉर्म आणि अनुभव याचा वापर करुन घेण्यासाठी त्याला T20 वर्ल्ड कपमध्ये ओपनरची जबाबदारी देण्यात आली. पण तो अजून पर्यंत आपल्या लौकीकाला साजेशी कामगिरी करु शकलेला नाही. तीन सामन्यात त्याला अजूनपर्यंत एकदाही दोन आकडी धावा करता आलेल्या नाहीत. तीन सामन्यात 9 चेंडू खेळून त्याने अवघ्या 5 धावा केल्या आहेत.

एकाच पद्धतीने कोहली तीनवेळा आऊट

तिन्ही सामन्यात कोहली ऑफ साइडला खेळताना बाद झालाय. आयर्लंड विरुद्ध पहिल्या सामन्यात मार्कच्या गोलंदाजीवर ऑफ साइडला फटका खेळताना थर्ड मॅनला कॅच आऊट झाला. पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नसीम शाहच्या गोलंदाजीवर ऑफ साइडला फटका खेळताना पॉइंटला उभ्या असलेल्या फिल्डरकडे झेल दिला. काल नेत्रवाळकरच्या गोलंदाजीवर भोपळाही फोडता आला नाही. विकेटकीपरकडे झेल दिला. तिन्ही सामन्यात शरीरापासून लांबचा फटका खेळताना तो आऊट झालाय.


आता हा बदल करण्याची संधी

कोहलीच ओपनर म्हणून हे अपयश लक्षात घेता आता यशस्वी जैस्वालला संधी देण्याची वेळ आलीय. यशस्वी जैस्वाल टीम इंडियासाठी ओपनिंग करतो. विराट कोहलीला पुन्हा नंबर 3 वर आणलं पाहिजे. पुढच्या कॅनडा विरुद्धच्या सामन्यात हा प्रयोग करण्याची रोहित-द्रविड जोडीकडे संधी आहे.