TNPL 2023 : T20 इतिहासातील सर्वात महागडा लास्ट बॉल, तब्बल 18 धावा कुटल्या, हे भारतात घडलं, VIDEO

| Updated on: Jun 14, 2023 | 9:28 AM

18 runs in 1 ball in T20 : तामिळनाडू प्रीमियर लीग TNPL 2023 मध्ये शेवटच्या चेंडूवर असं काय घडलं? ते VIDEO मध्ये पहा. T20 क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय.

TNPL 2023 : T20 इतिहासातील सर्वात महागडा लास्ट बॉल, तब्बल 18 धावा कुटल्या, हे भारतात घडलं, VIDEO
TNPL 2023
Image Credit source: VideoGrab
Follow us on

चेन्नई : एका ओव्हरमध्ये 6 सिक्स मारले, त्यानंतर क्रिकेट प्रेमींच्या मनात विचार आला, आता यापुढे काय?. लास्ट ओव्हरमध्ये रिंकू सिंहने 30 धावा चोपून सहज लक्ष्य गाठलं, तेव्हा वाटलं कमाल झाली. अनेकदा लास्ट बॉलवर एक रन्सही करता येत नाही. पण आता क्रिकेटच्या मैदानात एक वेगळीच घटना घडलीय, जिथे बॅट्समनने लास्ट बॉलवर 18 धावा वसूल केल्या. T20 क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं, याची प्रचिती पुन्हा एकदा आलीय.

T20 क्रिकेटमध्ये लास्ट बॉलवर तब्बल 18 धावा निघाल्या. T20 क्रिकेटच्या इतिहासातील हा सर्वात महागडा चेंडू ठरलाय. लास्ट बॉलवर 18 धावा कशा? असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल.

लास्ट बॉलवर असं काय केलं?

फलंदाजाने लास्ट बॉलवर असं काय केलं? गोलंदाजांना काय चूक केली? हे सर्व आम्ही तुम्हाला सांगणारच आहोत, पण त्याआधी हे कुठे घडलय? ते जाणून घ्या. हे घडलय भारतात. तामिळनाडू प्रीमियर लीग TNPL मध्ये लास्ट बॉलवर 18 रन्स बनले.

शेवटच्या चेंडूवर असं काय घडलं?

अभिषेक तंवरने लास्ट ओव्हर टाकली. समोर स्ट्राइकवर संजय यादव होता. अभिषेकने त्याला बोल्ड केलं. या विकेटच सेलिब्रेशन सुद्धा सुरु झालं. पण अंपायरने नो बॉल दिला. त्यानंतर फ्री हिट मिळाला. त्यावर संजय यादववे सिक्स मारला. आश्चर्य म्हणजे पुन्हा तो नो बॉलच होता. आतापर्यंत 8 धावा निघाल्या होत्या.

पुढच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या, पण….

अभिषेक तंवरच्या पुढच्या चेंडूवर 2 धावा निघाल्या. पण तो सुद्धा नो बॉल होता. त्यानंतर पुढचा चेंडू वाईड टाकला. एक्स्ट्राची एक धाव मिळाली. गोलंदाजाने 12 धावा दिल्या होत्या.

लास्ट बॉलची इतकी मोठी किंमत?

अखेरीस अभिषेकने शेवटचा लीगल चेंडू टाकला. पण चेंडूवर नजर बसलेल्या संजय यादवने सिक्स मारला. अशा प्रकारे लास्ट बॉलवर 18 धावा निघाल्या. 3 नो बॉल आणि 1 वाइड चेंडूची किंमत 18 धावा देऊन चुकवावी लागली.


लास्ट बॉलवर 18 धावा करणारी टीम 52 रन्सनी जिंकली

TNPL 2023 मध्ये चेपॉक सुपर गिल्स आणि सलेम स्पार्टन्स या दोन टीम्स आमने-सामने होत्या. चेपॉकने पहिली बॅटिंग करताना 20 ओव्हर्समध्ये 5 विकेट गमावून 217 धावा केल्या. यात लास्ट बॉलवर 18 धावा वसूल करणाऱ्या संजय यादवने 12 चेंडूत 31 धावा काढल्या. 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सलेम स्पार्टन्सने फक्त 169 धावा केल्या. 52 धावांच्या मोठ्या फरकाने चेपॉक सुपर गिल्सने विजय मिळवला.