पर्थ: कुठल्याही फलंदाजासाठी टेस्टमध्ये शतक झळकावणं, स्वप्न पूर्ण होण्यासारख असतं. कारण क्रिकेटच्या सर्वात कठीण फॉर्मेटमध्ये शतक झळकावणं, लहान मुलांचा खेळ नाही. पर्थ सारख्या विकेटवर शतक झळकावणं विशेष बाब असते. ऑस्ट्रेलियाच्या दोन फलंदाजांनी या विकेटवर वेस्ट इंडिज विरुद्ध पहिल्या कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये डबल सेंच्युरी झळकवली. स्मिथने नाबाद 200, तर लाबुशेन 204 धावांची इनिंग खेळला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या इनिंगमध्ये 598 धावा केल्या. पण या सगळ्यामध्ये या टीमच आणि फॅन्स मन मोडणारी एक घटना घडली. पर्थच्या ज्या विकेटवर दोन डबल सेंच्युरी लागल्या, तिथेच ट्रेविस हेडची शतक झळकवण्याची संधी फक्त 1 रन्सने हुकली.
कसा OUT झाला?
ट्रेविस हेड व्यक्तीगत 99 धावांवर वेस्ट इंडिजचा कॅप्टन क्रेग ब्रेथवेटच्या चेंडूवर बोल्ड झाला. ब्रेथवेटचा चेंडू हेडने कट करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू बॅटच्या कडेला लागून स्टम्पवर आदळला. हेड अवघ्या 1 रन्सने आपल्या पाचव्या कसोटी शतकाला हुकला.
हेडच मन मोडलं
ट्रेविस हेड बोल्ड झाल्यानंतर निराश दिसला. त्याचा सहकारी खेळाडू स्टीव्ह स्मिथने काही सेंकदआधीच आपला द्विशतक पूर्ण केलं होतं. हेड आऊट होताच, पर्थच्या मैदानात अचानक शांतता पसरली. कोणाला विश्वासच बसत नव्हता की, पर्थ एका पार्ट टाइम गोलंदाजाच्या बॉलिंगवर आऊट झालाय.
Getting a reprisal on 99 isn’t for everyone ?
Travis Head chopped on when on the verge ?#AUSvWI pic.twitter.com/EsxqkNp78p
— Cricket on BT Sport (@btsportcricket) December 1, 2022
ऑस्ट्रेलियन फलंदाजांची कमाल
पर्थ कसोटीच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाचा फक्त एक फलंदाज अपयशी ठरला. डेविड वॉर्नर 5 रन्स करुन आऊट झाला. त्यानंतर ख्वाजा 65 धावांची इनिंग खेळला. लाबुशेन आणि स्मिथने डबल सेंच्युरी झळकावली. हेडने आक्रमक बॅटिंग करताना 99 धावा फटकावल्या. ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ आणि लाबुशेनने सर्वाधिक 251 धावांची भागीदारी केली. त्यानंतर स्मिथ आणि हेडने 196 धावा जोडल्या. दुसऱ्या विकेटसाठी ख्वाजा आणि लाबुशेनने 142 धावांची भागीदारी केली.