मुंबई: IPL स्पर्धेबद्दल पुन्हा एकदा संशयाचं धुकं निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. गुजरात टायटन्सने आयपीएलच विजेतेपद मिळवणं, त्या सामन्याला असलेली अमित शाहंची (Amit Shah) उपस्थिती यावरुन सोशल मीडियावर काही जणांनी निकाल फिक्स (fixing) असल्याचा आरोप केला होता. आता खुद्द भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी तसा आरोप करुन घरचा आहेर दिला आहे. IPL स्पर्धेवर फिक्सिंगचा आरोप होण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी सुद्धा आयपीएल स्पर्धेवर आरोप झाले आहेत. 2013 मध्ये आयपीएल स्पर्धेत स्पॉट फिक्सिंगच प्रकरण घडलं होतं. त्यावेळी काही क्रिकेटपटूंना अटक झाली होती. दोन संघ बॅन झाले होते. त्या घटनेने भारतीय क्रिकेटला मूळापासून हादरवून सोडलं होतं. सर्वप्रथम 2000 साली क्रिकेट विश्वाला फिक्सिंगच्या प्रकरणाने हादरवून सोडलं होतं. दक्षिण आफ्रिकेचा दिवंगत कॅप्टन हॅन्सी क्रोनजे आणि बुकी संजय चावला यांच्या संभाषणाच्या रेकॉर्डींगस पोलिसांकडे होत्या. हर्षल गिब्ससह दक्षिण आफ्रिकेच्या आणखी दोन क्रिकेटपटूंचा नाव या प्रकरणात त्यावेळी आलं होतं.
“टाटा आयपीएलच्या निकालामध्ये घोटाळा झाल्याची गुप्चरयंत्रणांमध्ये भावना आहे. संशायचं धुक दूर करण्यासाठी चौकशीची आवश्यकता आहे. त्यासाठी जनहित याचिका दाखल करावी लागेल. कारण अमित शाह यांचा मुलगा BCCI मध्ये महत्त्वाच्या पदावर आहे, त्यामुळे सरकारी यंत्रणा स्वत:हून चौकशी करणार नाहीत”, असं सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे.
2013 साली इंडियन प्रीमियर लीगमध्ये स्पॉट फिक्सिंग आणि बेटिंगच मोठं प्रकरण घडलं होतं. त्यावेळी दिल्ली पोलिसांनी तीन क्रिकेपटूंना अटक केली होती. श्रीसंत, अजित चांडिला आणि अंकित चव्हाण या तीन क्रिकेपटूंना अटक झाली होती. त्यांच्यावर स्पॉट फिक्सिंगचे आरोप होते. हे तिघेही त्यावेळी राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचे. याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या दुसऱ्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी विंदु दारा सिंह, चेन्नई सुपर किंग्सशी संबंधित असलेला गुरुनाथ मयप्पन यांना बेटिंगच्या आरोपाखाली अटक केली होती.
जुलै 2015 मध्ये आरएम लोढा समितीने चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना दोन वर्षांपासाठी निलंबित केलं. पुढे पतियाळा हाऊस कोर्टाने श्रीसंत, अजित चांडिला आणि अंकित चव्हाण .या तिघांना निर्दोष मुक्त केलं. मार्च 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयायने श्रीसंतवर BCCI ने घातलेली बंदी उठवली.
दोन वर्षांपूर्वी म्हणजे 2020 साली आयपीएलमध्ये फिक्सिंग होऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI ने यूके स्थित कंपनी ‘स्पोर्टरडार’शी करार केला होता. ‘स्पोर्टरडार’कडे आपल्या फ्रॉड डिटेक्शन सर्व्हिसच्या (FDS) माध्यमातून मॅच फिक्सिंग, बेटिंग आणि अन्य भ्रष्ट प्रकार रोखण्याची व्यवस्था आहे. 2020 साली दुबईमध्ये आयपीएल स्पर्धेच आयोजन करण्यात आलं होतं.
‘स्पोर्टरडार’ या कंपनीने FIFA, UEFA अशा विविध लीगसोबत फिक्सिंग रोखण्यासाठी काम केलं आहे. भारतात राज्य स्तरावरील काही लीन स्पर्धांमध्येही बेटिंग, फिक्सिंगचे प्रकार घडतात.
फ्रॉड डिटेक्शन सर्व्हिस ही एक वेगळी सेवा आहे. बेटिंगशी संबंधित असणाऱ्या घोटाळ्यांचा FDS च्या माध्यमातून शोध लावता येतो. एफडीएसमध्ये गणितीय व्यवस्था आहे. त्याशिवाय ते फिक्सिंगचा छडा लावण्यासाठी डाटाबेसही मेन्टेन करतात.
There is widespread feeling in intelligence agencies that the Tata IPL Cricket outcomes were rigged. It may require a probe to clear the air for which PIL may be necessary since Govt will not do it as Amit Shah’s son is defacto dictator of BCCI
— Subramanian Swamy (@Swamy39) June 2, 2022
फिक्सिंग रोखण्यासाठी ICC आणि BCCI यांनी अनेक पावलं उचलली आहेत. पथक स्थापन केली, कंपन्यांबरोबर करार केले आहेत. सुब्रमण्यम स्वामी यांनी केलेल्या आरोपात किती तथ्य आहे, हे तपासानंतरच समोर येईल. पण मूळात न्यायालयात अशी कुठली जनहित याचिका टिकेल का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे.