ICC Under-19 Cricket World Cup 2023 : दहा वर्षांपूर्वी गोंगाडी रेड्डी यांनी आपली जीम बंद करण्याचा आणि फिटनेस ट्रेनरची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आपलं एकमेव अपत्य गोंगाडी त्रिशाच क्रिकेटपटू बनण्याच स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी इतका कठोर निर्णय घेतला. तत्कालीन आंध्र प्रदेशच्या भद्रादी कोठागुडेम जिल्ह्यातील भद्राचलम येथे गोंगाडी रेड्डी यांची जीम होती. गोंगाडी रेड्डी स्वत: हॉकी प्लेयर होते. अंडर-16 हॉकी टुर्नामेंटमध्ये त्यांनी भारतीय हॉकी टीमच प्रतिनिधीत्व केलय.
फायनलमध्ये गोंगाडी त्रिशाने किती रन्स केल्या?
गोंगाडी रेड्डी यांनी मुलीच्या क्रिकेट प्रशिक्षणासाठी जीम बंद करण्याचा निर्णय घेतला. चार एकरमध्ये पसरलेली शेती सुद्धा विकली. रविवारी 29 जानेवारी 2023 रोजी हैदराबादची ही युवा क्रिकेटर 24 रन्सची इनिंग खेळली. सौम्या तिवारीसोबत गोंगाडी त्रिशाने 46 धावांची भागीदारी केली. महिला अंडर 19 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडच्या 69 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गोंगाडी त्रिशाच्या या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या. टीम इंडियाने पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेला हा टी 20 वर्ल्ड कप जिंकला.
क्रिकेटसाठी सिकंदराबादला शिफ्ट झालो
“मी फिटनेसचा व्यवसाय आणि नोकरी करण्याआधी राज्याच्या अंडर-16 हॉकी टीममध्य खेळायचो. मी हॉकीसोबत क्रिकेटही खेळायचो. माझ्या मुलीने क्रिकेट खेळावं अशी माझी इच्छा होती. त्रिशा सुरुवातीला भद्राचलम येथे क्रिकेट खेळायची. तिचं क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही सिकंदराबाद येथे शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला” असं गोंगाडी रेड्डी इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाले.
अशा विजयासाठी मी कुठलही नुकसान पचवीन
“याच कारणामुळे मला जीम बाजारभावापेक्षा 50 टक्के कमी किमतीला एका नातेवाईकाला विकावी लागली. त्यानंतर मुलीच्या ट्रेनिंगसाठी मी 4 एकर शेती विकली. भारताच्या अंडर-19 वर्ल्ड कप विजयात, तिला जिंकताना पाहणं हे त्रिशाच्या क्रिकेटबद्दलच्या तळमळीच फळ आहे. अशा विजयासाठी मी कुठलही नुकसान पचवायला तयार आहे” असं गोंगडी रेड्डी यांनी सांगितंल.
कार्टुन ऐवजी क्रिकेट सामने दाखवले
आयटीसीमध्ये नोकरी आणि जीम चालवत असल्याने गोंगडी रेड्डी अनेकदा रात्री उशिरा घरी यायचे. त्रिशाने टीव्हीवर कार्टुन ऐवजी क्रिकेट मॅच पाहावी, यासाठी गोंगडी रेड्डी आणि त्यांची पत्नी माधवी प्रयत्न करायचे. जुन्या दिवसांची आठवण सांगताना गोंगडी रेड्डी म्हणाले की, “त्रिशाचा जन्म झाला, तेव्हा मी पत्नीला सांगितलं होतं. त्रिशा जेव्हा टीव्ही पहायला सुरुवात करेल, तेव्हा आपण तिला कार्टुन ऐवजी क्रिकेट सामने दाखवू”
वडीलांनी अशी दिली कोचिंग
“त्रिशा अडीच वर्षांची झाली, तेव्हा मी तिला प्लास्टिकची बॅट आणि बॉल आणून दिल्याची आठवण त्यांनी सांगितली. पाच वर्षांची असताना, मी तिला सोबत जीममध्ये घेऊन जायचो. तिला 300 पेक्षा जास्त थ्रो डाऊन चेंडूंचा सराव द्यायचो. त्यानंतर मी स्थानिक मैदानात सिमेंटची विकेट बनवली. त्यानंतर मी नोकरी आणि जीमपेक्षा जास्तवेळ त्रिशाच्या कोचिंसाठी द्यायचो” असं गोंगाडी रेड्डी म्हणाले.