भारतात जन्मलेला खेळाडू रातोरात बनला UAE चा कॅप्टन, आशिया कप आधी मोठी बातमी

| Updated on: Aug 19, 2022 | 5:37 PM

आशिया कपसाठी (Asia cup) यूएईने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यूएई संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे. आधी या संघाच कर्णधारपद अहमद रजाकडे होतं.

भारतात जन्मलेला खेळाडू रातोरात बनला UAE चा कॅप्टन, आशिया कप आधी मोठी बातमी
uae team
Image Credit source: icc
Follow us on

मुंबई: काही दिवसात आशियाई उपखंडात क्रिकेटच (Cricket) युद्ध सुरु होईल. आशियाई विजेते बनण्यासाठी संघ आपसात भिडतील. मुख्य फेरी आधी क्वालिफायरचे सामने होतील. संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) संघही यात सहभागी होणार आहे. आशिया कपसाठी (Asia cup) यूएईने आपल्या संघाची घोषणा केली आहे. यूएई संघाच्या नेतृत्वात बदल झाला आहे. आधी या संघाच कर्णधारपद अहमद रजाकडे होतं. पण आता मूळ केरळच्या असलेल्या चुंदगापॉयल रिजवानला संघाचं कॅप्टन बनवण्यात आलं आहे.

रजा अजूनही कॅप्टन, पण….

रजा टी 20 संघाचा कॅप्टन नसला, तरी वनडे संघाच कर्णधारपद त्याच्याकडेच आहे. रजाची गणना यूएईच्या यशस्वी कर्णधारांमध्ये होते. त्याच्याच नेतृत्वाखाली टीम मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात टी 20 वर्ल्ड कपसाठी पात्र ठरली होती. त्याने 27 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. 18 सामन्यात संघाला विजय मिळवून दिलाय. रिजवानचा जन्म भारतात केरळ मध्ये झाला. तो यूएईला गेला. तिथूनच तो क्रिकेट खेळतोय.

यूएईच्या टीम मध्ये दिल्लीचा मुलगा दाखवणार जलवा

यूएईने आशिया कपसाठी जो संघ निवडलाय, त्यात दिल्लीचाही एक मुलगा आहे. चिराग सुरी या खेळाडूच नाव आहे. चिराग 2014 पासून यूएईसाठी खेळतोय. त्याने 2018 मध्ये वनडे डेब्यु केला होता. त्यानंतर काही महिन्यांनी टी 20 मध्ये डेब्यु केला. तो सातत्याने यूएईच्या संघातून खेळतोय. तो प्लेइंग-11 चा भाग आहे. त्याने 24 टी 20 सामन्यात 655 धावा केल्या आहेत. यात सहा अर्धशतकं आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 116 चा आहे.

असा आहे कार्यक्रम

क्वालिफायर सामने ओमान मध्ये खेळले जाणार आहेत. यूएईला आपला पहिला सामना 21 ऑगस्टला कुवेत विरुद्ध खेळायचा आहे. 22 ऑगस्टला सिंगापूर विरुद्ध मैदानात उतरायच आहे. 24 ऑगस्टला यूएईची टीम हाँगकाँग विरुद्ध सामना खेळेल. या क्वालिफायर फेरीतून टीम मुख्य फेरीत प्रवेश करेल.

एशिया कप-2022 साठी यूएईचा संघ

संयुक्त अरब अमिराती: चुन्दगापॉयल रिजवान (कॅप्टन), चिराग सुरी, अहमद रजा, अलीशान शराफू, मुहम्मद वसीम, साबिर अली, वृति अरविंद, बासिल हमीद, रोहन मुस्तफा, काशिफ दाऊद, कार्तिक मयप्पन, जहूर खान, जवार फरीद, आर्यन लाकड़ा, सुल्तान अहमद, जुनैद सिद्दीकी फहद नवाज.