मेलबर्न: टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) सलग दुसऱ्यांदा कमाल करण्याचं नामीबियाच स्वप्न मोडलं. राऊंड – 1 चा शेवटचा सामना अटी-तटीचा झाला. नामीबियाचा UAE ने 9 धावांनी पराभव केला. त्यामुळे त्यांचा सुपर-12 (Super-12) मध्ये प्रवेशाचा मार्ग संपुष्टात आलाय. श्रीलंका आणि नेदरलँडच्या टीमने सुपर 12 मध्ये प्रवेश केला आहे. नामीबियाचा पराभव ही भारतासाठी सुद्धा चांगली बातमी आहे. कारण श्रीलंकेसारख्या मजबूत संघाऐवजी सुपर 12 मध्ये नेदरलँडची टीम ग्रुप 2 मध्ये असेल.
भारत विरुद्ध नेदरलँड मॅच कधी?
जीलॉन्गमध्ये गुरुवारी 20 ऑक्टोबरला ग्रुप ए चा सामना झाला. श्रीलंकेने नेदरलँडला हरवून सुपर 12 मध्ये आपलं स्थान पक्क केलं. श्रीलंकेची टीम भारत-पाकिस्तानच्या गटात जाणार की, ऑस्ट्रेलिया-इंग्लंडच्या याकडे लक्ष होतं. नामीबियाची टीम जिंकली असती, तर ते ग्रुपमध्ये पहिल्या स्थानावर गेले असते. भारत आणि नेदरलँडचा सामना 27 ऑक्टोबरला होईल.
कमी धावा बनवूनही जिंकली यूएईची टीम
UAE ने टॉस जिंकला. त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. नामीबियाच्या चांगल्या गोलंदाजीसमोर यूएईने धीमी सुरुवात केली. त्याचा परिणाम टीमच्या धावसंख्येवर झाला. ओपनर मोहम्मद वसीमने सर्वाधिक 50 धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये कॅप्टन रिजवानने 29 चेंडूत 43 धावा ठोकल्या. बासिल हमीदने 14 चेंडूत 25 धावा ठोकून धावसंख्या 148 पर्यंत पोहोचवली.
नामीबियाने किती धावा केल्या?
यूएईच्या गोलंदाजीसमोर नामीबियाने खराब सुरुवात केली. कॅप्टन एरासमससह संपूर्ण टॉप आणि मीडल ऑर्डर कोसळली. नामीबियाने 13 व्या ओव्हरमध्ये 69 धावात 7 विकेट गमावल्या. त्याचवेळी नामीबियाचा पराभव निश्चित दिसत होता. लास्ट ओव्हरमध्ये 14 धावांची गरज होती. पण वीजा आऊट झाला. नामीबियाच्या टीमने 8 बाद 141 धावा केल्या. 8 धावांनी त्यांचा पराभव झाला.