मुंबई: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी (Syed Mushtaq Ali) स्पर्धेत पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. टुर्नामेंटच्या पहिल्या 3 मॅचमध्ये पृथ्वीने जबरदस्त प्रदर्शन केलय. आज चौथ्या सामन्यात मात्र पृथ्वीला पहिल्या तीन मॅचसारखी (Match) अपेक्षित कामगिरी करता आली नाही. पहिल्या तीन सामन्यात पृथ्वी विरोधी टीमच्या गोलंदाजांवर तुटून पडला होता. पण आज चौथ्या मॅचमध्ये मात्र तो हतबल दिसला.
पृथ्वी शॉ ला बाद करणाऱ्या या गोलंदाजाच नाव आहे, उमेश यादव. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत आज मुंबई आणि विदर्भामध्ये मॅच आहे. उमेश यादवने या टुर्नामेंटमधून आज पुनरागमन केलं.
पृथ्वीने सुरुवात कशी केली?
मुंबई आणि विदर्भात मॅच आहे. या मॅचमध्ये मुंबईच्या टीमची पहिली बॅटिंग आहे. पृथ्वी शॉ ओपनिंगला उतरला होता. त्याने 3 चौकार आणि 1 षटकारासह मोठी इनिंग खेळण्याचे संकेत दिले होते. पण उमेश यादवने विदर्भासाठी हा धोका टाळला.
पृथ्वी क्लीन बोल्ड
उमेश यादव सय्यद मुश्ताक अली टी 20 टुर्नामेंटमध्ये आपली पहिली मॅच खेळतोय. मुंबई विरुद्धच्या सामन्याद्वारे त्याने विदर्भाच्या टीममध्ये पुनरागमन केलं. उमेशने या मॅचमध्ये धोकादायक ठरणाऱ्या पृथ्वी शॉ ला क्लीन बोल्ड केलं.
पहिल्या 3 सामन्यात पृथ्वीच्या 218 धावा
पृथ्वी शॉ ने सय्यद मुश्ताक अली टी 20 टुर्नामेंट 2022 च्या पहिल्या 3 सामन्यात 218 धावा केल्या आहेत. यात एक 134 धावांची शतकी इनिंग आहे. एक 55 धावांची अर्धशतकी खेळी आहे. पण चौथ्या मॅचमध्ये पृथ्वीला असा कारनामा करता आला नाही. विदर्भाविरुद्ध पृथ्वी 13 चेंडूत 19 धावा करुन आऊट झाला. या छोट्या इनिंगमध्ये सुद्धा त्याने 4 चौका लगावले.
पृथ्वीच नाही शिवम दुबेलाही केलं आऊट
उमेश यादवने या मॅचमध्ये दोन विकेट घेतल्यात. आधी त्याने पृथ्वीला क्लीन बोल्ड केलं. त्याने 4 ओव्हरमध्ये 38 धावा दिल्या. पृथ्वीशिवाय त्याने शिवम दुबेलाही आऊट केलं.