मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून तीन T20 सामन्यांची मालिका सुरु होत आहे. नुकतीच ऑस्ट्रेलिया विरुद्ध टी 20 सीरीज संपली. या मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. पुढच्या महिन्यात ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. त्या दृष्टीने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही टीम्स विरुद्ध टी 20 सीरीज महत्त्वाची आहे. कारण या सीरीजच्या निमित्ताने टीम इंडियाला कमतरता, त्रुटी दूर करण्याची संधी आहे.
कधी मिळणार या प्रश्नांची उत्तर?
T20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला अजूनही सर्व प्रश्नांची उत्तर मिळालेली नाहीत. अजूनही काही आघाड्यांवर टीम चाचपडतेय. यात गोलंदाजी प्रामुख्याने चिंतेचा विषय आहे. टीम इंडियाच्या गोलंदाजांना अजूनही सूर सापडलेला नाही. डेथ ओव्हर्समधील गोलंदाजी विशेष चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय फिल्डिंगमध्येही बरीच सुधारणा करावी लागणार आहे.
कोणत्या 3 खेळाडूंची एंट्री?
त्यामुळे आजपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरु होत असलेली टी 20 मालिका महत्त्वाची आहे. या सीरीजआधी टीम इंडियात तीन खेळाडूंची एंट्री झाली आहे. श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद टीममध्ये दाखल झालेत. उमेश यादवही दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये खेळणार आहे.
NCA मध्ये पाठवलेले ते तीन खेळाडू कोण?
दीपक हुड्डाला पाठिची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो या सीरीजमध्ये खेळत नाहीय. हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमारला आराम देण्यात आलाय. या तिघांनाही नॅशनल क्रिकेट अकादमी NCA मध्ये पाठवण्यात आलय. तिथे ते त्यांच्या
फिटनेसवर काम करतील
मोहम्मद शमी अजूनही कोविड-19 मधून पूर्णपणे बरा झालेला नाही. तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 सीरीजमध्ये खेळणार नाही. टी 20 वर्ल्ड कपसाठी स्टँडबाय खेळाडूंमध्ये मोहम्मद शमी आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 सीरीजसाठी अशी आहे टीम इंडिया
रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर आणि शाहबाज अहमद.