ढाका: टीम इंडिया विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात बांग्लादेशचे टॉप ऑर्डरचे फलंदाज अडचणीत आले. खासकरुन उमरान मलिकच्या वेगाने फलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. उमरान मलिकने आपल्या वेगाने आणि बाऊन्सर चेंडूंनी बांग्लादेशचा बेस्ट बॅट्समन शाकीब अल हसनला चांगलच हैराण केलं. शाकीब उमरानसमोर असहाय्य दिसला. त्याला उमरानचे चेंडूच समजत नव्हते. त्याचाच फायदा उचलून उमरानने टाकलेला एक बाऊन्सर शाकीबच्या हेल्मेटवर आदळला.
बाऊन्सरने हादरला
शाकीब अल हसनने उमरानच्या वेगवान बाऊन्सरचा 12 व्या ओव्हरमध्ये सामना केला. उमरानने या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शाकीबला बाऊन्सर टाकला. हा बाऊन्सर चुकवण्यासाठी शाकीब खाली वाकला. पण चेंडू हेल्मेटला लागला. चेंडू इतका वेगात होता की, हेल्मेट घालूनही त्याला हादरा जाणवला. त्याने हेल्मेट काढलं. त्यावेळी केएल राहुलने त्याची विचारपूस केली. शाकीब हेल्मेटमुळे वाचला. पण त्याच्या कानाजवळ वेदना झाल्या.
वॉशिंग्टन सुंदरने संपवला शाकीबचा खेळ
शाकीब अल हसनला वॉशिंग्टन सुंदरने शिखर धवनकरवी झेलबाद केलं. सुंदरच्या चेंडूवर स्वीपचा फटका खेळताना शाकीबने हवेत फटका मारला. वॉशिंग्टन सुंदरने शाकीबनंतर अफीफ हुसैनला बोल्ड केलं. त्याआधी त्याने मुश्फिकुर रहीमला बाद केलं. उमरान मलिकने आपल्या दुसऱ्याच ओव्हरमध्ये नजमुल शंटोला बोल्ड केलं.