IND vs SL 3rd T20: Umran Malik चा घातक बॉल, तीन टप्पे लांब उडाला स्टम्प, पहा VIDEO

| Updated on: Jan 08, 2023 | 2:58 PM

IND vs SL 3rd T20: या सीरीजमध्ये उमरान मलिकने एकापेक्षा एक सरस विकेट काढलेत, तोच सिलसिला त्याने राजकोटमध्येही कायम ठेवला.

IND vs SL 3rd T20: Umran Malik चा घातक बॉल, तीन टप्पे लांब उडाला स्टम्प, पहा VIDEO
Ind vs sl umran malik
Image Credit source: BCCI
Follow us on

राजकोट: तिसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर मोठा विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने ही सीरीज 2-1 अशी जिंकली. टीम इंडियाने पहिली बॅटिंग केली. निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 228 धावांचा डोंगर उभारला. सूर्यकुमार यादवने 51 चेंडूत 112 धावा फटकावल्या. त्यामुळे टीम इंडियाला ही धावसंख्या उभारता आली. या टार्गेटचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव 137 धावात आटोपला. या सामन्यात अर्शदीप सिंगने तीन विकेट काढल्या. हार्दिक पंड्या, उमरान मलिक आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी दोन विकेट काढल्या.

स्टम्प तीन टप्पे लांब उडाला

पहिल्या दोन टी 20 प्रमाणे या मॅचमध्ये उमरान मलिकने पुन्हा एकदा भेदक गोलंदाजी केली. त्याने दोन महत्त्वाच्या विकेट काढल्या. वानिंन्दु हसरंगा आणि माहीश तीक्ष्णा या दोघांना उमरानने पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. उमरानने या मॅचमध्ये 146 KMPH वेगाने टाकलेल्या बॉलवर माहीश तीक्ष्णा क्लीन बोल्ड झाला. हा विकेट खूपच अप्रतिम होता. उमरानच्या चेंडूचा वेग इतका होता की, स्टम्प तीन टप्पे लांब उडाला.


लाइन मीस केली

उमरानने जेव्हा हा विकेट काढला, तेव्हा भारत विजयाच्या वाटेवर होता. उमरान त्याची व्यक्तीगत तिसरी ओव्हर टाकत होता. तिसऱ्या बॉलवर त्याने तीक्ष्णाला बोल्ड केलं. तीक्ष्णाने मोठा फटका खेळण्याच्या नादात बॉलची लाइन पूर्णपणे मीस केली. चेंडूने थेट ऑफ स्टम्प उडवला.

155 KMPH वेगवान बॉल

उमरानने या मॅचमध्ये तीन ओव्हर्समध्ये 31 धावा देऊन 2 विकेट काढल्या. त्याने तीन सामन्यात 7 विकेट काढल्या. सीरीजच्या पहिल्या टी 20 सामन्यात त्याने 155 KMPH वेगात गोलंदाजी करताना त्याने श्रीलंकन कॅप्टन दासुन शनाकाची विकेट काढली होती.