चार महिन्यांपूर्वीपर्यंत कोहली सर्वात ताकदवान खेळाडू होता, मग या 4 कारणांमुळे संपूर्ण चित्र बदललं; म्हणून कर्णधारपद सोडले 

| Updated on: Jan 16, 2022 | 11:43 AM

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकासह या फॉरमॅटमधील संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कोहलीला वनडे आणि टेस्टमध्ये कर्णधारपद कायम ठेवायचे होते, पण बोर्डाने त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले. साहजिकच, रोहितच्या वाढत्या उंचीने आणि संघातील जबाबदारीने कोहलीची दीर्घकाळ चाललेली मक्तेदारी मोडून काढली अशीही चर्चा चाहत्यांकडून सोशल मीडियावर सुरू आहे.

चार महिन्यांपूर्वीपर्यंत कोहली सर्वात ताकदवान खेळाडू होता, मग या 4 कारणांमुळे संपूर्ण चित्र बदललं; म्हणून कर्णधारपद सोडले 
भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली
Follow us on

दिल्ली – क्रिकेटचं  (cricket) भूषण म्हणून आपण ज्या खेळाडूकडे पाहत होतो. त्याने मागच्या चार महिन्यात टी-20, नंतर एकदिवसीय आणि आता कसोटीचे कर्णधारपद सोडले आहे. 2015 मध्ये ज्या कसोटी फॉरमॅटमध्ये कोहली (virat kohli) पहिल्यांदा संघाचा कर्णधार झाला. त्यामध्ये सात वर्षानंतर कोहलीने त्याच फॉरमॅटमध्ये टीम इंडियाच्या (india) कर्णधारपदाचा राजीनामा देऊन कर्णधारपदाचा कार्यकाळ संपवला असल्याची चाहत्यांची सोशल मीडियावर चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी भारतीय क्रिकेटचा सर्वात शक्तिशाली चेहरा म्हणून पाहिलेला विराट कोहली अचानक सर्वात वेगळा खेळाडू म्हणून त्याच्या चाहत्यांना पाहावयास मिळाला होता. त्यामुळे कोहलीने ज्या कसोटी फॉर्मेटमध्ये टीम इंडियाला उंचीवर नेले, त्या कसोटीतून त्याने अचानक राजीनामा का दिला, असा प्रश्न चाहत्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सुरूवातीला कोहलीने सप्टेंबर 2021 मध्ये T20 संघाच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर त्याने टी-२० विश्वचषकानंतर कर्णधारपद सोडणार होते. त्यानंतर त्याने वनडे आणि कसोटीत कर्णधारपद कायम ठेवणार असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना सांगितले होते. पण अचानक डिसेंबर महिन्यात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने कोहलीला वनडेच्या कर्णधारपदावरून हटवून रोहित शर्माकडे जबाबदारी देण्याचं धाडस केलं. क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेला निर्णय रोहितने यशस्वी करून दाखवला. आता विराट कोहलीनेही कसोटीचे कर्णधारपद सोडल्याने चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यामातून प्रश्न विचारायला सुरूवात केली आहे. कोहलीने असा निर्णय का घेतला हे अद्याप स्पष्ट केलेलं नाही.

विराट कोहलीने टी-२० विश्वचषकासह या फॉरमॅटमधील संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर कोहलीला वनडे आणि टेस्टमध्ये कर्णधारपद कायम ठेवायचे होते, पण बोर्डाने त्याच्याकडून वनडेचे कर्णधारपद काढून घेत रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवले. साहजिकच, रोहितच्या वाढत्या उंचीने आणि संघातील जबाबदारीने कोहलीची दीर्घकाळ चाललेली मक्तेदारी मोडून काढली अशीही चर्चा चाहत्यांकडून सोशल मीडियावर सुरू आहे.

वनडे कर्णधारपद हातून गेल्यानंतर विराट कोहली आणि बीसीसीआयमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दावा केला होता, की त्यांनी कोहलीला टी-20 कर्णधारपद सोडू नको, असे सांगितले होते, ज्याला प्रत्युत्तर म्हणून कोहलीने पत्रकार परिषदेत उघडपणे चुकीचे म्हणून बोर्डाशी शत्रुत्व स्विकारले. अशा स्थितीत नेहमीप्रमाणे मोठे खेळाडूही भक्कम फळीसमोर एकाकी पडतात, तेच कोहलीच्या बाबतीत घडले. कोहलीला असलेला बोर्डाचा पाठिंबा यामुळे संपुष्टात आणला.

झालेल्या T20 वर्ल्डकप न जिंकण्याचा युक्तिवाद कोहलीच्या विरोधात गेला तेव्हा त्याच्यावर कसोटीतील खराब फॉर्मचा दबाव वाढू लागला. कोहलीला गेल्या 2 वर्षांपासून कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. पण कसोटी क्रिकेटमध्ये परिस्थिती आणखीणच बिकट होती, जिथे तो गोलंदाजांवर पूर्वीप्रमाणे वर्चस्व राखू शकला नाही आणि त्याच चुकांमुळे तो सतत विकेट गमावत होता. त्यातच दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अनपेक्षित पराभवामुळे कोहलीला आपले स्थान मजबूत करण्याची संधीही उरली नाही.

Virat Kohli | कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला, तेव्हा विराटने झळकावले होते द्विशतक

#Virat Kohli : विराट कोहलीनं टीम इंडियाला मध्येच सोडलं, नव्या कर्णधाराच्या शोधात बीसीसीआय!

Virat Kohli Captaincy: कोहलीच्या कसोटी कर्णधारपद सोडण्याच्या निर्णयाबाबत गांगुलीने मौन सोडलं, म्हणाला…