मुंबई: T20 वर्ल्ड कपसाठी (T20 World cup) टीम इंडियाच मिशन सुरु झालय. कॅप्टन रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने पर्थमध्ये प्रॅक्टिस सुरु केलीय. 10 तारखेला टीम इंडियाला आपला पहिला सराव सामना खेळणार आहे. दरम्यान रविवारी सोशल मीडियावर ऋषभ पंत (Rishabh Pant) ट्रेंडमध्ये होता. यामागच कारणही तितकच इंटरेस्टिंग आहे.
सोशल मीडियावर हा वाद बराच गाजला
ऋषभ पंत आणि अभिनेत्री उर्वशी रौतेला यांच्या भांडणाबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. सोशल मीडियावर हा वाद बराच गाजला. आता उर्वशी रौतेलाने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेयर केलेत. त्यात तिने ऑस्ट्रेलियाला पोहोचल्याचा दावा केला आहे.
सातत्याने सोशल मीडियावरील पोस्टमधून वक्तव्य
टीम इंडिया सध्या टी 20 वर्ल्ड कपच्या तयारीमध्ये व्यस्त आहे. ऋषभ पंतही या टीमचा भाग आहे. सध्या तो पर्थमध्ये आहे. उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंत यांचा एक इतिहास आहे. दोघांच नाव परस्परांशी जोडलं गेलं आहे. मागच्या काही दिवसात उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतबद्दल सातत्याने सोशल मीडियावरील पोस्टमधून वक्तव्य केली आहेत.
नसीम शाहशी नाव जोडलं गेलं
उर्वशी मागच्या महिन्यात दुबईमध्ये सुद्धा पोहोचली होती. भारतीय टीम आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दुबईला गेली होती. त्यावेळी सुद्धा ऋषभ आणि उर्वशीची बरीच चर्चा झाली. उर्वशीच नाव पाकिस्तानी क्रिकेटर नसीम शाहशी सुद्धा जोडलं गेलं.
बर्थ डे च्या शुभेच्छा
आता नुकतच काही दिवसांपूर्वी उर्वशीने एक फोटो शेयर केला होती. सोबत हॅप्पी बर्थडे म्हणून कॅप्शन टाकलं होतं. त्यादिवशी ऋषभ पंतचा वाढदिवस होता. चाहत्यांनी लगेच त्याचा ऋषभशी संबंध जोडला.
आता उर्वशी ऑस्ट्रेलियाच पोहोचल्याने ऋषभ पंतच्या नावाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. ऋषभ पंतच करीयर खराब झालं, असं फॅन्सनी सोशल मीडियावर लिहिलय. त्याशिवाय अनेक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
टी-20 वर्ल्डकपसाठी भारतीय टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.